मुघल आणि ब्रिटिश साम्राज्यामुळे गाेवंशाचे महत्व कमी झाले

    28-Sep-2021   
Total Views |
 
 
भारतात मात्र गेली एक हजार वर्षे भारतीय गाेवंशाचा तिरस्कार करणारांची सत्ता असल्याने येथे गाेवंश वाढीकडे दुर्लक्ष झाले. गाेवंश चरण्यासाठी पिढ्यानुपिढ्या राखून ठेवलेली गायराने ही दुर्लक्षित राहिली त्यामुळे ती हडप झाली.
-(भाग :1516)
 

cow_1  H x W: 0 
 
भारतातील गाय जगभर कशी पसरली, याबाबत अनेक संस्थाने दावा करत असतात. पण त्यातील सत्य असे दिसते की, अठराव्या आणि एकाेणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी अनेक देशात तेथील शेतीसाठी भारतीय मजूर नेले. त्या मजुरांना त्यांच्या कुटुंबासह नेले. त्या मजुरांनी ब्रिटिशांच्या माेठमाेठ्या बाेटीतून आपल्या बराेबर गाय आणि बैलही नेले. त्यातून जगात भारतीय गाेवंश वाढला आहे. पहिली पन्नास वर्षे तिकडेही भारतीय गाईंची वैशिष्ठ्ये जाेपासली जायची पण नंतर त्यांचा उपयाेग गाेमांसासाठीच अधिक हाेऊ लागला.
ब्रिटिशांनीही हा गाेवंश त्यांच्या साम्राज्यातील उष्णकटिबंधातील अन्य देशात, ज्यात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि आि्रका खंडांचा समावेश हाेताे, तेथे हा गाेवंश ‘ड्राउट मास्टर’ म्हणून नेला.
 
भारतात मात्र गेली एक हजार वर्षे भारतीय गाेवंशाचा तिरस्कार करणारांची सत्ता असल्याने येथे गाेवंश वाढीकडे दुर्लक्ष झाले. गाेवंश चरण्यासाठी पिढ्यानुपिढ्या राखून ठेवलेली गायराने ही दुर्लक्षित राहिली त्यामुळे ती हडप झाली. भारतीय गाेवंशाचा गाेआधारित शेती याबाबतचा उपयाेग विस्मरणात जाऊन फक्त उकिरड्यावरील शेणखत येवढेच वापरात राहिले.आयुर्वेदाने गाेविज्ञान जपले. पण त्यांच्या अन्य औषधांना भावना देण्यासाठीच त्याचा अधिक उपयाेग झाला. सारी शेती आणि वैद्यक हे जर पंचगव्याच्या आधारे केले तर अनेक पटींनी उपयाेग हाेऊ शकताे, याचे प्रयाेग बंद झाले. त्यामुळे ज्या बाबींचा सार्वजनिक वापराशी संबंध नाही, अशी एकच बाब शिल्लक राहिली ती म्हणजे गाईला ‘गाेमाता’ मानणे. त्याच बराेबर गाईचे दूध वापरणे. त्याच बराेबर घरात गाईला माेठी आई स्थान देणे या बाबी आजही आहेत. पण त्याचे प्रमाण राष्ट्रीय न राहता ते ‘मायक्राेस्काेपिक’ राहिले आहे.