युराेपमध्ये जर्सी, हाेल्स्टनचा उपयाेग फक्त साम्राज्य विस्तारासाठी केला

    27-Sep-2021   
Total Views |
 
 
युराेपातील दुधाचे गाेवंश म्हणून परिचित असणारे जर्सी आणि हाेल्स्टन हे गाेवंशच जगभर नेले. भारतातील देशी गाेवंश नाहीसा व्हावा, यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम राबवला. (भाग : 1515)
 
 
 
cow_1  H x W: 0
 
वास्तविक जगातील प्रत्येक गाय हा आपल्या काळजीचा विषय असणे गरजेचे आहे. पण युराेपीय महासत्तांनी भारतीय गाईची वैशिष्ठ्ये लक्षात घेअून ती गाय जगातून हटविण्याचा शंभर वर्षाचा जागतिक पातळीवरील कार्यक्रम डाेळ्यासमाेर ठेवला आणि शंभर वर्षे राबवला म्हणून आपण आपली देशी गाय जपण्यासाठी खास प्रयत्न करणे आवश्यक झाले. गेली शंभर वर्षे युराेपीय महासत्तांना युराेपीय गाेवंश म्हणजे बाॅस ताैरस मानेवर वशिंड नसलेला गाेवंश जगभर पसरवला. वास्तविक त्याला आपण हरकत घेण्याचे कारण नव्हते.भारतीय गाेवंशात साऱ्या जगाला अतिशय कमी खर्चात समृद्ध करण्याचे सामर्थ्य आहे असे निरीक्षण ‘अ‍ॅग्रिकल्चरल टेस्टामेंट या पुस्तकात नाेंदवल्यानंतर त्याचा उपयाेग करून घेण्याऐवजी ताे गाेवंश नाहीसा कसा हाेईल, या दिशेनेच प्रयत्न केला.
 
येथील राजकारण्यांच्या मदतीने देशी गाेवंश हा सरकारी कामकाजातून गायब केला. तरीही जगभर भारतीय गाेवंश हा जगातील सर्वात अधिक संख्या असणारा गाेवंश आहे. पण ताे प्रामुख्याने गाेमांसासाठी वापरला जाताे.अनेक देशात ताे ‘ड्राउट मास्टर’ म्हणजे दुष्काळात टिकाव धरणारा म्हणून मान्यता पावलेला आहे. भारतात गेल्या दहा वर्षात गाेआधारित शेती हा जाे विषय पुढे आला आहे आणि वेगाने पसरत आहे, त्याकडे जागतिक संदर्भाने पाहिल्यास जगात आज उपलब्ध असलेल्या एक अब्ज भारतीय गाेवंशाच्या आधारे साऱ्या जगातील भूमी सुजलाम सुफलाम हाेऊ शकते.जगातील प्रत्येक शेतकऱ्याला ते हवेच आहे. कारण उत्पादन खर्च कमी झाला तरच त्याला त्याचा फायदा हाेणार आहे.
 
पण तसे झाले तर युराेपीय महासत्तांच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या रासायनिक खतांच्या कंपन्यांचे दरवर्षी दाेनशे लक्ष काेटी रुपयांचे नुकसान हाेणार आहे. त्या खेरीज रासायनिक खतावर जे विषाचा अंश असणारे पीक येते, तेच जगातील एशी टक्के जनता खात असते. त्यासाठी युराेपीय कंपन्यांच्या आधारे निर्मिती केलेली तीनशे लक्ष काेटींची रुपये किंमतीची औषधे खपत असतात. त्यामुळे भारतीय गाेवंशाचे जगातील ‘गाेमांसासाठीचे जनावर’ ही जी उपयाेगिता केली आहे, ती काेणत्याही स्वरूपात बदलली जाऊ नये, असे युराेपीय महासत्तांना वाटते.