गाेवंश न पाळणारा चीन आता गाेवंश पाळू लागला

    25-Sep-2021   
Total Views |
 
 
गाेवंश आणि चीन याकडे स्वतंत्र दृष्टिकाेनातून बघावे लागते. एकशे पंचेचाळीस काेटी लाेकसंख्या असलेल्या त्या देशात तुलनेने पिकाऊ जमीन कमी आहे. -(भाग : 1513)
 

cow_1  H x W: 0 
 
ताे थंड प्रदेश असल्याने प्रत्येकाला भारतासारख्या उष्ण कटिबंधातील लाेकांच्या तुलनेत दुप्पट कार्बाेहायडेटस् लागतात. काेणत्याही प्राण्याचा मांसाहार ही तेथील अत्यंत सवयीची बाब आहे.उंदीर, झुरळे, साप, कुत्री, मांजरे, मिळतील ते साऱ्या जातीचे पक्षी, डुकरे हे त्यांचे नियमित आहार आहेत. त्यातून वटवाघूळ हा त्यांच्या आहाराचा प्रकार झाला आणि त्यातून जगभर काेराेना वाढला. गाय हा त्यातीलच एक प्रकार हाेता पण गेल्या काही वर्षांत त्याकडे बघण्याचा चीनचा दृष्टिकाेन बदलला आहे.ऑस्ट्रेलियाच्या फोटेरा कंपनीच्या मदतीने त्यांनी पचणारे दूध मिळवले.त्याचा त्या देशाला फार उपयाेग झाला.
 
प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय पाहिजे, असे नवे धाेरण निर्माण झाले. पण चीन हा मूळचाच मांसाहारी देश असल्याने दुधाच्या वापरामुळे त्यांची मांसाहाराची प्रवृत्ती कमी झाली, असे अजिबात झाले नाही.पण गाेवंश वाढविण्याचा नियाेजनपूर्वक प्रयत्न सुरू झाला. तेथील शेतकऱ्यांना वीस काेटी गाई देण्याचे उद्दिष्ट समाेर ठेवले आहे. त्यातील बरेचसे उद्दिष्ट पूर्णही झाले आहे. गन्सू या शेतकऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर असलेल्या प्रांतात त्या सरकारने पाच काेटी गाईंचे वितरण केले आहे.आपण दाेन दृष्टीनी बघत आहाेत.
 
एक म्हणजे जगातील गाेतस्करीची व्याप्ती किती आहे, याचा अंदाज घेणे आणि दुसरे म्हणजे जगाच्या कानाकाेपऱ्यातगाेविज्ञानसंस्कृती कशी पाेहाेचेल, याचा प्रयत्न करणे. याचा पुरेसा प्रयत्न अजून भारतातही नीट पसरलेला नाही. भारतात दहा टक्के क्षेत्रावर हा प्रयाेग कमी किंवा अधिक प्रमाणात सुरू झाला आहे. भारतीय गाेवंशासंबंधी एका बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. पण भारतीय गाेवंशाच्या आधारे गाेआधारित शेती आणि वैद्यक हे प्रयाेग माेठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहेत. गेली किमान दहा हजार वर्षे तरी भारतात देशी गाईपासून मिळणाऱ्या ‘पंचगव्य’ म्हणजे दूध, दही, तूप, गाेमूत्र आणि शेण यांचा एकत्र वापर याचे गुणधर्म ग्रंथात दिले आहेत तसेच आहेत.