गेल्या पाच वर्षांत गाे-तस्करीच्या ज्या घटना पुढे आल्या आहेत, त्या पाहता हा विषय फक्त बेकायदा गाेमांस विकणाऱ्या तस्करी टाेळ्यांपुरता मर्यादित असावा, असे वाटत हाेते.
-(भाग : 1512)
गेल्याच महिन्यात आसाममध्ये ज्या घटना घडल्या, त्याच्या आधारे एक बाब स्पष्ट झाली की, गाईंची तस्करी करणाऱ्या टाेळ्या या गर्दसारखे मादक पदार्थ यांचाही व्यापार करतात आणि बेकायदा शस्त्रांच्या वाहतुकीचाही व्यवहार करतात. यातील काही धक्कादायक बाबी पुढे आल्यावर आसाम आणि मिझाेराम या राज्यातील पाेलिसही एकमेकांसमाेर युद्धासारखे उभे राहिले.या बाबी फक्त आसाम, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझाेराम यापुरत्या मर्यादित नाहीत, तर अन्यत्रही आहेत.ज्या राज्यांना देशाची सीमा लागू आहे आणि ज्या राज्यांत या घटना घडण्याची शक्यता असते. याखेरीज गेल्या पन्नास वर्षांत देशी गाेधन कमी करण्याच्या शासकीय याेजनाही झाल्या आहेत. आजपर्यंत देशी गाय कमी दूध देते, या कारणास्तव त्याकडे शेतकरीही दुर्लक्ष करत असत, पण आता देशी गाेवंशामुळे देशातील कृषिव्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येक बाबीला गती देण्याचे सामर्थ्य गाेवंशात असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याकडे बघण्याचा शेतकऱ्यांचाही दृष्टिकाेन बदलत आह त्यामुळे गेल्या पन्नास-साठ वर्षांतील गाेवंशाचे खरे तस्कर काेण हे स्पष्ट हाेऊ लागले आहे.
या ठिकाणी एका बाबीचा उल्लेख करणेआवश्यक आहे. ताे म्हणजे चीन हा काही शतके ‘लॅक्टाेसे इंटाॅलरंट’ म्हणजे दूध न पचणारा देश असताना अलीकडे माेठ्या प्रमाणावर गाेवंशवृद्धी करत आहे. यातील दाेन संदर्भांचा येथे थाेडक्यात उल्लेख करत आहे. ताे म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षांत चीनचे स्वरूप औद्याेगिक झाले आहे. दुधाचा उपयाेग कसा करायचा, याचे तंत्रज्ञान त्या देशाने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून अवगत केले.प्रचंड माेठी लाेकसंख्या असलेल्या या देशात दुधाच्या उपयाेगाने आहाराच्या काही समस्या साेप्या झाल्या. यात ऑस्ट्रेलियातील‘ाेन्टेरा’ या कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे.