गाेवंश तस्करीतून हाेत हाेती अू, गांजा, दहशतवादी हत्यारांची तस्करी

    22-Sep-2021   
Total Views |
 
 
प.बंगालपासून ते आसामपर्यंत सध्या गाेवंश तस्करीचा विषय राजकारण्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर सर्वात प्राधान्याने आहे.
-(भाग : 1510)
 
 

cow_1  H x W: 0 
 
चार महिन्यांपूर्वी आसाममध्ये निवडून आलेल्या राज्य सरकारने गाेहत्याबंदीच्या कायद्याचा प्रस्ताव तयार केला आणि मिझाेरामपासून ते प.बंगालपर्यंत अनेक राज्यांतील काही राजकारण्यांची प्रकृती बिघडली.जी माहिती पुढे आली, त्यानुसार आसामच्या सर्व बाजूच्या सीमेवरून गाेवंशाची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक तर चालत असेच, पण त्याबराेबर सर्व पद्धतीची तस्करी चालत असे. अधिकाधिक बाबी म्हणजे अू, गांजा या यादीतील महागड्या वस्तू.पण, त्यात गेल्या काही वर्षांत दहशतवादी संघटनांना लागणाऱ्या शस्त्रांच्या चाेरट्या आयातीची आणि निर्यातीची भर पडली आहे. या भागातील गाेवंश, अू आणि शस्त्रे यांच्या कायदेशीर आणि बेकायदेशीर आयातीचा आणि निर्यातीचा इतिहास तीनशे ते पाचशे वर्षांचा आहे. एकाेणिसाव्या शतकात इ.सन 1840 आणि इ.सन 1860 या दरम्यान चार वर्षांची युद्धेही झाली आहेत.
 
ती युद्धे ब्रिटिश आणि चीनमधील क्विंग साम्राज्य यामध्ये झाली. त्याला इतिहासात ‘ओपियम वाॅर’ म्हणजे अफूची युद्धे अशा नावाने संबाेधतात. ब्रिटिशांनी भारतात त्यांची सत्ता स्थिरस्थावर केल्यावर त्यांनी मिळेल ते कारण शाेधून चीनचे साम्राज्य मिळवण्याचा घाट घातला. त्या काळात त्यांना चहा आणि अू हे दाेन घटक कारण म्हणून मिळाले. अूच्या व्यापारावर नियंत्रण ही जगातील त्या काळातील माेठी उलाढाल असल्याने ताे विषय दीर्घकाळ युद्धाचा झाला. त्यात ब्रिटनला अफूच्या व्यापारावर नियंत्रण मिळाले; पण चीनचे साम्राज्य मिळवता आले नाही.अू, चहा, गाेवंश, अन्य मादक पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रे हा त्या भागातील अनेक पिढ्यांचा व्यापार आहे. गेल्या सत्तर वर्षात दाेन्ही भागात राजवटी बदलल्या आहेत; पण ओपियम ट्रेड हा महत्त्वाचा ट्रेड आहे. पूर्वी या व्यापाराच्या वाहनातून शस्त्रे आणि जनावरे नेली जात. आता कायदेशीर आणि बेकायदेशीर स्वरूपाचा जनावरे हा मुख्य व्यापार आहे आणि त्या वाहनातून दहशतवाद्यांसाठी शस्त्रे, मादक पदार्थ यांची ये-जा चालते.