अलाहाबाद उच्च न्यायालयातील निर्णय हा जावेद नावाच्या कसायाच्या अर्जावरून दिला आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अखिलेंद्रसिंह यांची एक गाय चाेरली हाेती आणि तिची कत्तल केली हाेती. जावेद याने अशी कृती यापूर्वीही केली हाेती.-(भाग :1509)
सत्याचा संदर्भ सन्माननीय न्यायम मूर्तींंनी न्यायपत्रातही दिला आहे. उच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयापुढे एक पाऊल टाकून अलाहाबाद न्यायालयाने काही मुद्दे मांडले असल्याने त्या निर्णयाला अधिक ऐतिहासिक महत्व आले आहे. या न्यायमूर्तींनी दाेन तीन मुद्दे अधाेरेखित केले आहेत.सर्वात महत्वाचा म्हणजे सरकारने गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घाेषिक करण आहे. या देशात भिन्न धर्मांचे आणि विविध उपासना पद्धतीचे लाेक राहतात.
उपयाेगितेच्या दृष्टीनेही गाय ही शेती, वैद्यक, दूध याबाबत अतिशय महत्वाचा पशु आहे. अशावेळी सर्वांनीच गाईचा सन्मान ठेवणे आवश्यक आहे.वैदिक संस्कृतीतील चार वेदामध्ये गाईच्या एक एक स्वतंत्र वैशिष्ट्याचे वर्णन केले आहे. बायबल, कुराण, बाैद्धधर्म यातील गाेरक्षणाबाबत विधाने आणि लाेकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडीत मदनमाेहन मालवीय यांनी गाेहत्याबंदीस देशाच्या स्वातंत्र्याएवढे महत्व दिले हाेते. या साऱ्याचा परिणाम भारतीय संस्कृतीतून ज्या देशांची संस्कृती साकार झाली आहे, त्या सर्व देशावर झाला आहे. जगातील निम्मी लाेकसंख्या गाेभक्त आहे.