महागडे वकील गाेरक्षकांना परवडणे अशक्य

    17-Sep-2021   
Total Views |
 
 
 
 

cow_1  H x W: 0 
 
सर्वाेच्च न्यायालयाच्या काेणत्याही निर्णयाला महत्त्व असतेच आणि घटनापीठ निर्णयाला निश्चितच अधिक महत्त्व असते. अलाहाबादचे निकालपत्र ज्या प्रमाणे अखिलेंद्रसिंह विरुद्ध जावेद कसाई असे आहे. (भाग : 1506)
 
या घटनापीठातील कामकाजाचे वैशिष्ट्य असे की, गाेआधारित शेतीपासून ते ऊर्जानिर्मिती, गाेवैद्यक दुसऱ्या बाजूला गाेमांची निर्यात यावर नवे नवे संदर्भ स्वीकारण्यात आले. घटनापीठात झालेल्या युक्तिवादात राष्ट्रीय विषयात ऐतिहासिक कामगिरी केलेले राजीव दीक्षित हाेते.विराेधात एक कसाई संघटना हाेती. कसाई संघटनेने तीन वकील दिले. साेली साेराबजी यांचीफी वीस लाख रुपये, कपिल सिब्बल यांचीफी 22 लाख रुपये, राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांचीफी 33 लाख रुपये हाेती, पण राजीव दीक्षित यांचे म्हणणे असे हाेते की, मी साधा वकील ’ देण्यासही असमर्थ आहे. मला न्यायालयाने वकील द्यावा, अन्यथा ही केस मीच चालवीन. त्यावर न्यायालयाने वकील दिला आणि त्यातही अनेक युक्तिवाद हे राजीव दीक्षित यांनीच केले.प्रामुख्याने अवघ्या दहा किलाे शेणात एक एकर शेती हाेते आणि गाेआधारित राष्ट्रीय वैद्यक हे येथील सामान्य माणसाचे मायबाप ठरू शकते, या विधानावर प्रथम न्यायालयानेही आक्षेप घेतले.
 
यावर राजीव दीक्षित यांनी अनेक प्रात्यक्षिके न्यायालयासमाेर मांडली. प्रामुख्याने शेणावर वीज करता येते, हे प्रात्यक्षिक दाखवताना घटनापीठाचे काही सन्माननीय न्यायमूर्ती हे त्या इंधनाच्या माेटारीत बसून ेरफटका मारायला तयार झाले. त्यांनी ताे मारलाही आणि त्याचा निकालपत्रात अतिशय महत्त्वपूर्ण उल्लेख केला. जाेपर्यंत हा विषय फक्त सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने मांडला जायचा, तेव्हा ताे फक्त भावनिक वाटायचा, पण देशाच्या शेतीचे अर्थशास्त्र अनेकपटींनी गती घेणार आहे, हे आता लक्षात येऊ लागल्यावर हा विषय आण्विक संशाेधन किंवा औद्याेगिक संशाेधन या पातळीवर पाेहाेचला पाहिजे. आजपर्यंत गाय हा विषय फक्त पाेटात तेहेतीस काेटी देव या परिमाणाने माेजला गेला, त्यामुळे पंचवीस हजार रुपये खर्चाच्या रासायनिक खतांच्या तुलनेत गाेआधारित शेती ही फक्त शंभर ते पाचशे रुपयांत हाेते, या बाबीवर त्याचा अनुभव घेतल्याखेरीज विश्वासही बसणार नाही.