गाेठ्यातील जनावरांची काळजी घेणे, त्यांच्या धारा काढणे, त्यांना काय हाेते आहे याची नेमकी माहिती करून घेऊन त्याची डोक्तराना कल्पना देणे, याचे अभ्यासक्रम सध्या तयार हाेत आहेत. -(भाग : 1503)
गेल्या सहा वर्षांत तरुणांमध्ये निरनिराळी काैशल्ये विकसित करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने राबवला, त्याचा चांगला उपयाेग झाला. आणि आता ग्रामीण भागातील समस्या लक्षात घेऊन त्यांचे अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. नव्या अभ्यासक्रमाअंतर्गत ग्रामाेदय चेंबर ऑफ काॅमर्स अॅण्ड टेक्नाॅलाॅजी यांच्या वतीने हे अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत.याची तेलंगण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची पहिली बैठक इंडियन काैन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गाई-म्हशींची काळजी घेणे, धारा काढणे आणि त्यांचे पालनपाेषण करणे यावर एक पदविका अभ्यासक्रम असेल, असा अभ्यासक्रम हा दहावीनंतर असेल.गाेपालन आणि शेतीचे निरनिराळे प्रकार मिळून अनेक पदविका अभ्यासक्रम असतील आणि तीन पदविका अभ्यासक्रम मिळून एक पदवी अभ्यासक्रम असेल.
देशातील प्रत्यक्ष कामाची काय गरज आहे, हे लक्षात न घेता आजपर्यंत फक्त सायन्स, आर्टस्, काॅमर्स, इंजिनीअरिंग वगैरे अभ्यासक्रम सुरू झाले. त्या अभ्यासक्रमांना मागणी हाेतीच; पण देशातील माेठ्या प्रमाणावरील कामाच्या गरजा आणि बेकार तरुणांची संख्या यांचा मेळ घालणारे अभ्यासक्रम तयार झाले नव्हते. याचा परिणाम असा झाला की, बेकारी माेठ्या प्रमाणात वाढली.
ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणावर काैशल्य उपलब्ध असते; पण त्याला प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण नसल्याने ते तरुण फक्त बारा बलुतेदार पद्धतीने काम करतात. त्यालाच जर प्रशिक्षण आणि प्रगत यंत्रसामुग्री यांची जाेड दिली, तर ते तरुण इंजिनीअरिंगचे काैशल्यही आत्मसात करू शकतील.जयशंकर तेलंगण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू व्ही प्रवीण राव म्हणाले, शेती करताना बदलते तंत्रज्ञान, जनावरांचे आहार, बदलते हवामान, अन्नप्रक्रिया यांचे शिक्षण दिले, तर तरुण पिढीला त्याचा ार उपयाेग हाेईल.