या विषयाची मध्यवर्ती प्रयाेगशाळा गाेविग्यान अनुसंधान संस्था, देवळापार, नागपूर येथे आहे. देशातील शंभराहून अधिक गाेविज्ञान संस्था आणि वीस विद्यापीठे यांच्याशी समन्वय करून तेथे कामे सुरूच असतात.(भाग : 1500)
माेहनराव देशपांडे यांच्या पुस्तकाचे आणि प्रयाेगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात माेठ्या प्रमाणावर यशस्वी झाले आहेत आणि गाेविज्ञान संशाेधन संस्था, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रात माेठे संघटन उभे करून आणि कांही गावे दत्तक घेऊन ते प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाेहाेचवले आहे.अन्यथा या विषयाची मध्यवर्ती प्रयाेगशाळा गाेविग्यान अनुसंधान संस्था, देवळापार, नागपूर येथे आहे. देशातील शंभराहून अधिक गाेविज्ञान संस्था आणि वीस विद्यापीठे यांच्याशी समन्वय करून तेथे कामे सुरूच असतात. त्यांनी त्यावर वाययही माेठ्या प्रमाणावर उपलब्ध केले आहे. त्यांची वेबसाइट व फेसबुक यावर ती माहिती आहे.गाेआधारित शेतीच्या या लढ्यात सामान्य माणूस सहभागी झाला, तर त्याची वाढ अजून वेगाने हाेईल. त्यासाठी त्याची सुरुवात घरातील मागची बाग, दहाव्या मजल्यावर फ्लॅटच्या कट्ट्यावरील ठेवलेल्या पाच-दहा फुलझाडाच्या कुंड्यांपासून हा प्रयाेग केला, तर त्या त्या ठिकाणी त्याचा उपयाेग तर हाेईलच, पण मूळ चळवळीला बळ मिळेल.
त्यासाठी शेणापासून केलेले रंग, उदबत्या, गणेशाच्या मूर्ती या साऱ्याला महत्त्व आहे. ऋषिकृषी या पुस्तकानुसार केवळ दहा किलाेच्या शेणाच्या आधारे केलेले अमृतपाणी वापरून तीसफुटी ऊस, प्रत्येक क्षेत्रात विक्रमी उत्पादने, शेतावर काेणताही राेग किंवा कीड पडण्याची शक्यता नाही. शिवाय गेल्या तीस वर्षात गायब झालेल्या चिमण्या,फुलपाखरे आणि मधमाश्या पुन्हा शेताकडे येऊ लागतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गाेविज्ञानाच्या आधारे त्याच भागातील एक सामान्य शेतकरी तानाजी निकम यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड यामध्ये नाव नाेंदविले गेले आहे.कर्नाटक राज्याने गाेहत्याबंदी कायदा करून एका नव्या पर्वाला आरंभ केला आहे. देशातही बहुतेक राज्यात असे कायदे झाले आहेत.