एमएस्सी अॅग्री हा पूनम राऊत यांचा शैक्षणिक परिचय आहे; पण एवढीच माहिती सांगितली, तर त्यांचा याेग्य परिचय समजणार नाही. खंबाटकी घाटाच्या मूळच्या डाेंगराचे नाव ‘महादेव डाेंगर रांग’ असे आहे. त्या साऱ्या भागात त्या संतसेवा वर्ग तयार करण्यापासून ते गाेआधारित शेती करण्यापर्यंत त्या मार्गदर्शन करत असतात. (भाग : 1468)
त्यांच्या कामाबद्दल त्यांना इ.सन 2019 चा श्रद्धेय माेराेपंत पिंगळे गाेसेवा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा म्हणजे गाेआधारित शेतीचा परिचय हा जैविक शेती म्हणून करून देता येऊ शकताे.पण, त्याहीपेक्षा ती संतसेवा शेती किंवा याेगिक शेती म्हणून करून दिला तर ताे अधिक याेग्य ठरेल. सध्याच्या विज्ञान युगात ‘याेगिक शेती’ हा लगेच स्वीकारला जाईल असा नाही. पण, गाेआधारित शेती करायला घेतल्यावर हा आपाेआप येणारा अनुभव आहे. शेती करणाऱ्यांत ‘नास्तिक’ मंडळीही असतात किंवा नास्तिक असण्यात आक्षेपार्ह असे कांहीच नाही.प्रत्यक्षात नास्तिक असणारे, पण प्रचंड कर्तृत्त्ववान आणि प्रामाणिक असणारे मी अनेक लाेक पाहिले आहेत. अशी मंडळी गाेआधारित शेती केल्यावर आस्तिक हाेतात असे नाही, पण स्वभावात शांतपणा आणि खाेलपणे विचार करण्याची सवय वाढते. मी परसबाग शेती किंवा टेरेसगार्डन हा विषय पीएचडीसाठी घेतला. त्यात शहरी भागात घराेघर गाेआधारित शेतीची आवड वाढेल असा हेतू आहेच;
पण घराेघरचे वातावरण जर याेगिक हाेणार असेल तर पीएचडीचाही सामाजिक उपयाेग हाेऊ शकेल, अशा दृष्टीने मी ताे विषय निवडला.आता केवळ परसबाग किंवा टेरेस गार्डन यांचा विचार केल्यास त्यातील अमृतपाणी, बीजसंस्कार, गाेमूत्रपाणी फवारणे याबाबी समजावून घ्याव्या लागतील. त्यातील मुख्य भाग म्हणजे अमृतपाणी करणे.एका एकराला दहा किलाे शेण पुरते. त्या दृष्टीने आपण जेवढे क्षेत्र निश्चित करून दहा किलाे शेणाला अर्धा किलाे मध आणि पाव किलाे गाईचे तूप या प्रमाणात अतिशय कमी प्रमाणात ते घालून त्याची मात्रा परसबागेतील त्या मातीला द्यायची.परसबागेची माती ही भुसभुशीत असावी.याच अमृतपाण्यात बागेत लावायची राेपे त्याच्या मुळाच्या बाजूने वीस मिनिटे भिजवावीत. बियाणे टणकदार असेल, तर ते वीस मिनिटे भिजवावे. बियाणाची लगेच साल सुटण्याची शक्यता असेल, तर पाचच मिनिटे भिजवावे. त्याची लागवड केल्यावर आठ दिवसांनी अमृतपाणी द्यावे.