गाेआधारित शेतीने जे खेड्यात शक्य आहे. त्याच प्रमाणे अगदी दहाव्या मजल्यावरही गाेआधारित, अमृतपाणी, जीवामृत, नजीवामृत, शेणखत, गाेखूरखत, वर्मी खत, पंचगव्य खत अशांचा वापर केला, तर गाईच्या सानिध्याचा आनंद मिळेल.
(भाग : 1466)
गाईचे शेण, गाेमूत्र, दूध, तूप, या आधारे केलेल्या पंचगव्यात खेड्यातील आणि शहरातीलही समस्या साेडविण्याचे सामर्थ्य आहे, पण ताे विषय त्या त्या लाेकांना पटविण्यासाठी अविश्रांत प्ररिश्रम घ्यावे लागतात. प्रथम हा विषय खेड्यातही पटत नाही आणि शहरातही पटत नाही.शहरात राहणाऱ्यांनीच ठरविलेले असते की, आपल्या घराच्या आजूबाजूला बाग करण्यासारखी जागा नाही, पण अशा बागेमुळे भाजा,फुले तर मिळतातच, पण आपले मन हीफुलते. ती राेपे, ती झाडे आपल्या जिव्हाळ्याची हाेतात, असे समजल्यावर हवी तेवढी जागा आजूबाजूला दिसू लागते. हा झाला फक्त शहरी निवासी मंडळींच्या दृष्टीचा भाग. पण, रासायनिक खताच्या शेतीमुळे शहरे आणि खेडी यांचा संबंध फक्त धान्य आणि फळे यांचा ‘डिमांड अॅण्ड सप्लाय’ असा झाला आहे.
रासायिक खतामुळे त्या त्या शेतात उरलेल्या जैविक अंशामुळे धान्य येते, पण तेही त्यातील जिवंतपणा हरवलेले.अशावेळी ताे जिवंतपणा जर पुन्हा आणणायचा असेल, तर ताे खेड्यातही आणावा लागेल आणि शहरीभागातही आणावा लागेल. याच बराेबर मी केलेल्या पाहणीनुसार शहरी भागातील माेकळी जागा असाे किंवा बहुमजली घरामधील वऱ्हांडे असाेत, तेथेही जिवंत भाज्या, जिवंतफुले आणि जिवंत फळे मिळाली की, जीवनही बदलते. याचा अनुभव मी अनेकांना घेऊन दिला आहे. गाेआधारित शेतीच्या परिभाषेत बाेलायचे, तर असे म्हणता येईल की, तेथेही उपलब्ध हाेणाऱ्या पृथ्वीतत्त्व आणि वायू तत्त्व यांच्या आधारे वातावरणात सजीवता आणू शकताे.
लहानपणी गाईचे दूध प्यायल्याने मुले कुशाग्र व शांत स्वभावाची हाेत असत.गाेआधारित शेतीने जे खेड्यात शक्य आहे. त्याच प्रमाणे अगदी दहाव्या मजल्यावरही गाेआधारित, अमृतपाणी, जीवामृत, धनजीवामृत, शेणखत, गाेखूरखत, वर्मी खत, पंचगव्य खत अशांचा वापर केला, तर गाईच्या सानिध्याचा आनंद मिळेल. हे मुद्दे आज लक्षात येणार नाहीत; पण याेगिक शेती, जैविक शेती, गाेआधारित शेती यांचे परिचय हाेतील. ज्यांना अध्यात्माशी संबंध आहे, त्यांना तेथे ध्यानाला बसता येईल. ज्यांनी गाईच्या गाेठ्यात जाऊन ध्यान कसे लागते, याचा अनुभव घेतला आहे, त्यांना घरातील याेगिक शेतीचा अनुभव येईल.