टेरेस गार्डनमधून गाेविज्ञान घराेघर नेणाऱ्या पूनम राऊत

    06-Aug-2021   
Total Views |
 
 
जेथे वाव आहे तेथे बहुमजली बागही करता येते आणि दैनंदिनी घरच्या वापराला लागणाऱ्या मिरच्या, काेथिंबिरी, छान फुलांची झाडे घेता येतात.(भाग : 1465)
 

tree_1  H x W:  
 
ग्रामीण भागात रासायनिक खते वापरली जातात, तेव्हा एक एक गावात शेतीसाठी दाेन ते पाच काेटी रुपयांची खते वापरली जातात. त्यात शेत उद्ध्वस्त हाेते आणि शेतकरीही उद्ध्वस्त हाेताे. पण, पाणी दुप्पट लागते. घरातील औषधांचा खर्च प्रचंड वाढताे. हा विषय काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सांगणाऱ्या, शेतकऱ्यांच्या मेळाव्यात कार्यशाळा घेणाऱ्या आणि वारकऱ्यांच्या समाेर कीर्तन प्रवचनातून मांडणाऱ्या पूनम राऊत हे निराळेच रसायन आहे. त्यांनीच गेली तीन वर्षे शहरातील ‘टेरेस गार्डन’ हा विषय तेवढाच महत्त्वाचा केला आहे.सर्वसाधारणपणे टेरेस गार्डन म्हणजे शहरी लाेकांच्या मनाेरंजनासाठी काही फुलझाडे, दाेन तीन फळझाडे लावणे असा प्रकार दिसून येताे. अशा टेरेस गार्डनसाठी अलीकडे मार्गदर्शन वर्गही निर्माण झाले आहेत. त्याकरता खतांची आणि मातीची पॅकेटस्ही मिळतात. त्यामुळे ही श्रीमंती हाैस, माैज यातील बाब वाटते. पण, हा अभ्यास करताना माझा दृष्टिकाेन पूर्णपणे वेगळा आहे. गेल्या दहा वर्षांत मी फार माेठ्या प्रमाणावर गाेआधारित शेतीचा अनुभव घेतला आहे. त्याचे प्रशिक्षणही घेतले आहे.
 
गाेआधारित शेती किंवा जैविक शेती नसल्यामुळे शेतकरीही रासायनिक खतांच्या आधारे उत्पादने घेऊन स्वत:ची शेती कशी खराब करून घेतात, हेही पाहिले आहे. एमएससी अ‍ॅग्रीच्या अभ्यासक्रमानंतर दहा वर्षे शेतीचा अनुभव घेतल्यावर माझे असे मत झाले की, शेतमालाचा ग्राहक हा शेतीसाठी प्रशिक्षित केल्याखेरीज शेती सुधारणार नाही. म्हणून मी ‘टेरेस गार्डन’ हा विषय निवडला.टेरेस गार्डन यामध्ये एखाद्या बहुमजली घराच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापासून वरील मजल्यावरील छाेट्या फ्लॅटच्या वऱ्हांड्यातील चार-पाच किंवा दहा- बारा कुंड्याची बागही असेल किंवा माेठा पॅसेज, घरामागची माेकळी जागा, वरच्या मजल्यावरील माेकळा पॅसेज, प्रत्यक्ष टेरेस, अशा अनेक जागांवर झाडे लावता येतात. त्यावर जाेपर्यंत विचार केलेला नसताे. तेव्हापर्यंत आपल्याकडे जागाच कुठाय, असे वाटते. पण जेथे वाव आहे तेथे बहुमजली बागही करता येते आणि दैनंदिनी घरच्या वापराला लागणाऱ्या मिरच्या, काेथिंबिरी, छानफुलांची झाडे घेता येतात. याची जेव्हा मी प्रात्यक्षिके पाहिली तेव्हा याच विषयावर मी पी.एच.डी करण्याचे ठरविले.