गाेआधारित शेती हा तर ‘शब्देविण संवादु’

    05-Aug-2021   
Total Views |
 
 
मूळचा आध्यात्मिक पिंड असला तरी गाेविज्ञान किंवा गाेआधारित शेती हा विषय मांडताना त्या प्रामुख्याने ‘गाेविज्ञानाच्या आधारे हाेणारी आर्थिक प्रगती’ हाच विषय अतिशय अभ्यासपूर्ण मांडतात. (भाग : 1464)
 
 


cow_1  H x W: 0 
 
देशात आज दहा लाख काेटी रुपयांचे रासायनिक खत वापरले जाते, त्यातील बरेचसे आयात हाेते, त्या शेतीला गाेआधारित शेती पद्धतीपेक्षा अनेक पटींत पाणी लागते आणि त्या शेतीच्या पिकात, धान्यात आणि अन्नात विषांश असताे, हे तर जगजाहीर आहे. त्याचा परिणाम म्हणजे काेणाला ना काेणाला काही ना काही आजार आहे. त्यासाठी या देशात पंचवीस लाख काेटी रुपयांची औषधे वापरली जातात. त्यातीलही बरीचशी आयात हाेतात. रासायनिक खते शेताला देणे सुरू केल्यावर सतत त्या खतांची मात्रा वाढवावी लागते. त्याचप्रमाणे विदेशी औषधांची सवय झाली की, तात्पुरते बरे वाटते; पण त्या औषधांची गरज सतत वाढतच राहते. त्याला प्रभावीपणे उत्तर देण्यासाठी गाेविज्ञान कसे उपयाेगी आहे, हा त्यांचा अभ्यासाचा आणि प्रचाराचा विषय असते. सामान्य माणसाला आणि ग्रामीण भागातही दैनंदिनी जीवनात आर्थिक विषयाबाबत जर काेणी मार्गदर्शन केले, तर ते हवेच असते.तरीही पाच देशी भाकड गाईंच्या आधारे गाेशाळा सुरू केलेल्या पूनम राऊत यांचा मूळचा हेतू पूर्ण वेगळा आहे.
 
‘मराठीत ज्ञानेश्वरीवाचन आणि गाेसेवा’ हे समानअर्थी शब्द आहेत, हे प्रत्येकाला समजावून सांगणे हे त्यांचे ध्येय आहे.संतसेवा संघटनांशी त्या जाेडलेल्या आहेतच; पण त्याच बराेबर त्या ज्ञानेश्वरी सप्ताह, भागवत सप्ताह करतात. त्या प्रवचनकारही आहेत. ज्ञानेश्वरी आणि गाेसेवा हे विषय ‘शब्देवीण संवादु’ या पातळीचे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचताे आणि गाेसेवाही करताे. पण, हे करताना एक प्रक्रिया न कळत हाेते ती म्हणजे आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचताे, तेव्हा ज्ञानेश्वरीही आपल्याला वाचत असते. त्यातून हाेताे ताेच ताे ‘शब्देविण संवादु’ गाईबाबत तर हा अनुभव अधिक स्पष्ट हाेताे. घरात गाय असली की, घरात शांतता तर असतेच, पण घरात वडीलधारी व्यक्ती असल्याचाही अनुभव येत असताे.माणसाची प्रकृती ही पंचकाेशात्मक आहे. त्यातील आध्यात्मिक प्रगती प्रत्यक्ष गाय किंवा गाेआधारित शेतीपद्धतीने घरात असलेले एखादे झाड, राेप यानेही हाेते.पूनम राऊत या गाेआधारित शेती, त्याचे राष्ट्रीय अर्थशास्त्र, त्यांचा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रभाव हा जेव्हा विषय मांडतात, तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश ‘शब्देविण संवादु’ वाटतही नाही.