भाकड गाईंच्या गाेशाळेने केली रासायनिक शेतीवर मात

    04-Aug-2021   
Total Views |
 
 
अ‍ॅग्रिकल्चर म्हणजे कृषिविज्ञान या विषयात एमएस्सी झाल्यावर आणि प्रबंधाचा अभ्यास सुरू असताना प्रतिकूल परिस्थितीत शिकलेली एक तरुणी किंवा महिला ‘भाकड गाईंची गाेशाळा’ चालवते, अशी बातमी वाचल्यावर ‘अन्य काही न जमल्यावर दुसरे काय करणार!’ अशी प्रतिक्रिया हाेणे साहजिक आहे. (भाग : 1463)
 
 

cow_1  H x W: 0 
 
पुणे-सातारा महामार्गावर ‘खंडाळा बावडा’ येथे राहणाऱ्या श्रीमती पूनम राऊत त्या भाकड गाईच्या गाेशाळेच्या मदतीने अमृतपाणी, जीवामृत, असे गाेआधारित शेतीचे घटक तयार करून त्या भागातील शेतकऱ्यांना शेतीला वापरण्यात येत असलेल्या रासायनिक खतांवर फुली मारायला लावली आहे.एका गावात सर्वसाधारणपणे दाेन ते पाच काेटी रुपयांचे रासायनिक खत वापरले जात असते. त्या भागातील पंचवीस गावांतील रासायनिक खते बंद झाली पाहिजेत, असा त्यांचा संकल्प आहे. त्या करत असलेल्या कामात त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्या माेहिमेत त्यांनी त्याच भागातील सतरा गाेशाळांना जाेडून घेतले आहे.
 
एका गाईच्या किंवा बैलाच्या मदतीने तीस एकर बागाईत शेती हाेते, हा त्यांचा सिद्धांत घराेघर पाेहाेचवणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्या ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर गाेआधारित शेतीचे अभ्यासवर्ग घेत असतात.त्यांच्या कामाला जाेडलेला नवा आयाम म्हणजे शहरी भागातील परसबाग, टेरेस गार्डन, घरातील वऱ्हांड्यात असणाऱ्या चार, पाच कुंड्या ठेवण्याच्या जागेतही गाेआधारित शेती कशी करायची यावरही त्या अभ्यासवर्ग घेतात. पुण्यातील वऱ्हांड्यातील कुंड्या, टेरेस गार्डन, परसबागवाल्यांच्या लहान आणि माेठ्या अनेक संघटना आहेत, एकेका संघटनेशी हजार हजार लाेक जाेडलेले आहेत. त्यांचे म्हणजे घरातील पाच-सहा राेपे किंवा पंधरावीस झाडे ही जर गाेआधारित घटकांनी युक्त असतील तर तुम्हाला ‘घरात गाय असण्याचा आनंद’ मिळेल. घरात मुलांचा अभ्यास चांगला हाेईल.