गायीच्या पाेटातील सूक्ष्म जंतू प्लॅस्टिक नष्ट करतात

    03-Aug-2021
Total Views |
 
 
व्हिएन्ना विद्यापीठाच्या संशाेधनाचा निष्कर्ष
 

cow_1  H x W: 0 
 
प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणे जगासमाेर एक फार माेठे आव्हान आहे. परंतु, गायीच्या पाेटातील सूक्ष्म जंतु प्लॅस्टिक नष्ट करण्यात सक्षम असतात, असे ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशाेधन केले आहे.प्लॅस्टिक शेकडाे वर्षे नष्ट हाेत नाही किंवा सडतही नाही. खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर, शिळे अन्न प्लॅस्टिक पिशवीत भरून कचराकुंडीच्या आसपास फेकून देण्याची बहुसंख्य गृहिणींची प्रवृत्ती. यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या माेकाट गायी या प्लॅस्टिक पिशवीतील अन्न प्लॅस्टिक पिशवीसह खातात, असे दृश्य राेजच दिसते. या संदर्भात ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना विद्यापीठांनी कित्येक वर्ष संशाेधन करून, असा निष्कर्ष काढला आहे की, गायीच्या पाेटातील सूक्ष्म जंतु प्लॅस्टिक नष्ट करण्यास सक्षम आहेत.
 
त्यामुळे गायींनी कितीही प्लॅस्टिक खाल्ले तरी गायींवर काेणताही दुष्परिणाम हाेत नाही, असे प्लॅस्टिक खाल्लेल्या मृत गायींचे पाेस्टमार्टेम केल्यानंतर निष्कर्ष काढला आहे. एक गाय सरासरी 5 ते 50 किलाे प्लॅस्टिक खाते.आपल्या देशात 1950 ते 2021 या 71 वर्षांच्या काळात 8 अब्ज टन प्लॅस्टिकचे उत्पादन झाले. प्लॅस्टिकचा पॅकिंगसाठी विशेषतः फूड पॅकिंगसाठी माेठ्या प्रमाणावर वापर हाेत असल्यामुळे प्रदूषण वाढत आहे. ऑस्ट्रियाच्या पशु शास्त्रज्ञांनी गायींवर संशाेधन करून काढलेल्या निष्कर्षानुसार गायीच्या पाेटात रूमेन नावाचा द्रव असताे. त्यात सूक्ष्म जंतु (बॅ्नटेरिया) असतात. हे बॅ्नटेरिया एंजाईमद्वारे प्लॅस्टिकसुद्धा वितळवू शकतात. नैसर्गिक पाॅलिएस्टर (एक प्रकारचे प्लॅस्टिक) प्रकारचे बॅ्नटेरिया प्लॅस्टिक वितळवितात. हे यापूर्वीही सिद्ध झाले हाेते 
 
नैसर्गिक पाॅलिएस्टर टाेमॅटाे आणि सफरचंदात आढळते. गाय जाे चारा खाते त्यात नैसर्गिक पाॅलिएस्टर असते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, गायींच्या पाेटातही नैसर्गिक पाॅलिएस्टर आणि सूक्ष्म जीव असतात, ते प्लॅस्टिक नष्ट करण्यात सक्षम असतात.गायींच्या पाेटातील रूमेन हा द्रव अंदाजे 100 लिटर असताे. शास्त्रज्ञांनी या द्रवामध्ये प्लॅस्टिक पावडर, प्लॅस्टिक फिल्म मिसळल्यानंतर हे प्लॅस्टिक रूमेनमुळे वितळल्याचे आढळून आल्याचे व्हिएन्ना विद्यापीठाच्या नॅचरल रिसाेर्से स अँड लाईफ सायन्सेसचे शास्त्रज्ञ डाेरिस रिबीच यांनी प्रतिपादन केले आहे.