जाेपर्यंत जनावरांच्या चाऱ्याकडे लक्ष दिले जाणार नाही, ताेपर्यंत त्या प्राण्याचे सामर्थ्यच कळणार नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षात तरी दुभत्या जनावरांना पेंड, नांगरट करणाऱ्या बैलांना अजून काही चांगले आंबवण, असा चांगला आहार दिला जाताे; पण त्या त्या जनावरांचे महत्त्व कमी झाले की, पुन्हा सुकी वैरणच वापरली जाते. (भाग : 1486)
सध्या गाई-बैल यांचे शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे गाेआधारित शेती केलेल्यांना शंभरपट अधिक फायदा झाला आहे. कदाचित शंभरपट या शब्दामुळेच हे उदाहरण विश्वासार्ह आहे का, अशी शंका येईल; पण गाेविज्ञान संशाेधन संस्था, पुणे किंवा गाेविज्ञान अनुसंधान संस्था देवळापार, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जेथे हे प्रयाेग झाले आहेत, तेथील उदाहरणे घेतली, तरी त्याची प्रचिती येईल. पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंभा हे गाव त्याचे उदाहरण आहे. त्याच प्रमाणे फलटणजवळील नांदल आणि अन्य वीस गावी असे घराेघर प्रयाेग झाले आहेत. महाराष्ट्रात व देशात घराेघरी झालेल्या या प्रयाेगांची तर माेजदादही करता येणार नाही. त्यातील मुद्दा एवढाच आहे की, ते प्रयाेग नीट लक्ष देऊन करावे लागतात.गाेवंशाकडून मिळणाऱ्या दुधापेक्षा गाेमूत्र आणि शेण अतिशय महत्त्वाचे म्हणजे अनेकपटींनी फायदा देणारे असते, याची प्रचिती आल्याखेरीज जनावरांना चांगला चारा देण्याचे महत्त्व समजणार नाही.
चांगल्या चाऱ्याचे उदाहरण द्यायचे झाले, तर कृष्णाकाठी हाेणाऱ्या शेवरी हा चारा खाऊन तेथील गाई आणि म्हशी जे दूध देतात, त्याचे पेढे सातारा शहरात मिळतात, त्याला कंदीपेढे म्हणतात किंवा काेल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी येथे काही र्बीचे प्रकार सुप्रसिद्ध आहेत. कर्नाटकात कृष्णा नदीला येऊन मिळणाऱ्या प्रत्येक नदीच्या काठावरील दुधाच्या पदार्थाचे काही वैशिष्ट्य आहे. बेळगावी कंदी, धारवाडी पेढे वगैरे. याचा उल्लेख एवढ्यासाठीच करायचा की, तेथे दुभत्या जनावरांच्या हिरव्या चाऱ्याकडे अधिक लक्ष दिले जाते.चांगल्या चाऱ्यासाठी तेवढाच चांगला प्रयत्न करावा लागताे, हे तर आलेच.नेपिअर ग्रास हे त्याचेच उदाहरण आहे.सध्या महाराष्ट्रात आणि देशातही नेपिअर ग्रासचे पीक कांही ठिकाणी घेता येते. पण, त्याला अडीचशे किलाे 14:14:14 आणि पन्नास किलाे युरिया दिला जाताे. त्याच प्रमाणे प्रारंभी हेक्टरी पाच टन शेणखत किंवा कंपाेस्ट खत दिले जाते. गाेआधारित शेती पद्धतीने दहा किलाे शेणावर आधारित अमृतपाणी महिन्यातून एक वेळा आणि दर आठवड्याला तीनशे लिटर पाण्यात तीन लिटर गाेमूत्र घालून ते फवारावे.