सध्याची वेळ अशी आहे की, प्रत्येक काम राेबाेटने करणे, यापुढेही जावून प्रत्येक क्षेत्रात आर्तीफशियल इंटेलिजन्सची यंत्रणा येणे सुरू हाेणार आहे. त्याही माध्यमातून किंवा त्याच्या बराेबरीने हे काम वाढले तर त्याला अधिक गती येईल. (भाग : 1482)
एकाेणिसाव्या शतकापासून युराेपात औद्याेगिक क्रांती सुरू झाली. त्याचे अनेक ताेटे जगाने भाेगले, तरी त्याचे परिणाम टाळता आले नाहीत. त्यामुळे यापुढे औद्याेगिक क्रांतीचे तंत्रज्ञान आणि भारतीय कृषिविज्ञान अशी त्याची शिस्त बसवली तरच देशाला त्याचा माेठा उपयाेग हाेईल.औद्याेगिक क्रांतीचे उपयाेग करून घेणे कमी श्रमात हाेत असते. पण भारतीय शेती अधिक लक्ष देऊन करावी लागते. तरीही येणाऱ्या काळात संगणक तंत्रज्ञान, राेबाेट तंत्रज्ञान आणि त्याहीपेक्षा प्रगत आर्तीफशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान वेगाने पुढे येत आहे. ते टाळणे कठीण आहे.अशावेळी त्या यांत्रिक क्षमतेचा उपयाेग आपल्या तंत्रासाठी करून घेतला तरच आपण स्पर्धेत टिकू. जी शेती स्वत: लक्ष देवून करावी लागते, ती लगेच लाेकप्रिय हाेत नाही, ही यामागील खरी समस्या आहे.
अनेक विद्यापीठे आणि कृषिमहाविद्यालये यांनी हे विषय सुरू केले आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणजे आदिवासी भागातील एक लाखाहून अधिक जी एकल विद्यालये आहेत आणि विद्याभारतीची प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालये मिळून काही काेटी विद्यार्थी संख्या आहे. या सर्वांचे मुख्य संशाेधन आणि प्रशिक्षण करणारे गाेविज्ञान अनुसंधान केंद्र नागपूरजवळ देवळापार येथे आहे.पुढील पाच वर्षांत देशाच्या नकाशावर टक्केवारीने माेजता येईल, असा याचा विस्तार झालेला असेल. पण सध्याची वेळ अशी आहे की, प्रत्येक काम राेबाेटने करणे, यापुढेही जावून प्रत्येक क्षेत्रात आर्टििफशियल इंटेलिजन्सची यंत्रणा येणे सुरू हाेणार आहे. त्याही माध्यमातून किंवा त्याच्या बराेबरीने हे काम वाढले तर त्याला अधिक गती येईल.