भारतात एकदा असे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर काअू प्रस्थापित झाले की, त्याचा चांगला उपयाेग हाेणार आहे. सर्वसाधारणपणे अशी सेंटर्स जेंव्हा येतात, तेंव्हा विदेशी गायीं आणि एक्सेलन्स सेंटर हे या देशात अजून माेठ्या प्रमाणावर खपवण्याचा संबंधित देशाचा प्रयत्न असताे.
(भाग : 1481)
तरीही भारतात सध्या जे गाेआधारित शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे आणि त्याचा विस्तार हाेत आहे, त्याच्या आधारे देशी गाेवंश हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया असणार आहे. भारतीय गायही विदेशी गायींच्या दूध देण्याच्या स्पर्धेत टिकू लागल्या आहेत आणि पुढेही जात आहेत.तेवढ्यापुरता हा मुद्दा पण मर्यादित नाही.येथील देशी गाय ही दूध देणारी असाे की नसाे किंवा एखादा बैल हा नांगरटीचे काम किंवा बैलगाडीचे काम करणारा असाे की नसाे, त्यांचे शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे सुमारे पंचवीस एकर बागाईत शेती यशस्वी हाेण्याचे तंत्र विकसित झाल आहे. हे तंत्र अजून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचलेले नाही. पण देशातील पन्नास लाख एकर जमीन या पद्धतीने केली जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. ते तंत्रज्ञान पारंपारिक आहे. तरीही ते कसे तरी किंवा काही तरी अशा पद्धतीतील नाही.
भारतातील याेगविज्ञान, आयुर्वेद विज्ञान अशी जी महत्वाची दहा शास्त्रे आहेत, त्यातीलच हे एक महत्वाचे शास्त्र आहे. अलिकडे देशाची लाेकसंख्या एकशेपस्तीस काेटीपेक्षा अधिक असल्याने दुधाचे उत्पादन हे काही काेटी टन याच परिभाषेत माेजावे लागत आहे. नवीन तंत्राच्या आधारे जर हजार हजार देशी गायींचे व्यवस्थापन करू शकलाे तर दुधाची मागणी, त्यांचा दर्जा याचबराेबर गाेमूत्र आणि शेण यांचीही उपलब्धता हाेऊन गाेआधारित शेती करणे शक्य हाेणार आहे आणि त्यात नव्या नव्या प्रयाेगानंतरही दिशा मिळणार आहे.
एका देशी गायीच्या किंवा बैलाच्या आधारे पंचवीस एकर बागाईत शेती म्हणजे नगद उत्पन्न देणाऱ्या शेतीचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळाले तेंव्हाही उपलब्ध हाेते.स्वातंत्र्याेत्तर काळात अनेकांनी त्यावर काम सुरू केले आणि यशस्वी प्रयाेगही केले. आज असे लक्षात येत आहे की, याचा सार्वत्रिक वापर सुरू झाला तर गेल्या सत्तर वर्षात भारतीय जमिनीची रासायनिक खतामुळे जी दुरवस्था झाली आहे, ती व्यवस्थित सुधारेल. दरवर्षी दहा लक्ष काेटी रुपयांची रासायनिक खते वापरली जातात, त्या ठिकाणी अगदी नाममात्र खर्चात उस, द्राक्षे, आंबा, नेहमीची पिके, सुका मेवा पिके हेही एक गाय किंवा बैल यांच्या शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे पंचवीस एकरातील शेती हाेईल. शेतकऱ्याची अर्थव्यवस्था बदलेल.