गाेमांस विकणारा झाला गाेसंस्कृतीचा चित्रकार

    02-Aug-2021   
Total Views |
 
 
वर्षानुवर्षे गाईचे मांस विकणाऱ्या घाना देशातील काेजाे र्मााे या तरुणाने ताे व्यवसाय साेडून देऊन गाईमुळे देशाेदेशींच्या संस्कृती कशा समृद्ध केल्या, यावर चित्रे काढण्यास आरंभ केला आहे. (भाग : 1461)
 

cow_1  H x W: 0 
 
त्याच्या चित्रांना युराेप, अमेरिकेतील माेठया शहरात मागणीही मिळत आहे. घानातील अतिशय गरीब घरात जन्मलेल्या काेजाे र्मााेने काेणताच उद्याेग नसल्याने त्याच भागातील बेवारशी गाय पकडायची आणि तिचे मांस विकायचे, अशा उद्याेगाने चार पैसे मिळवायला आरंभ केला. पण त्याच्या घराचा खर्च भागेना. म्हणून हेच काम अमेरिकेतील एका नातेवाइकाच्या ओळखीने केले तर चार पैसे जादा मि ळतील, अशा आकर्षणाने ताे आवश्यक ते परवाने मिळवून अमेरिकेत गेला.तेथे एका गाेमांसाच्या दुकानात ताे काम करू लागला. पण ते मांस विकता विकता त्याला गाय जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्याने गाईबाबत वाचन सुरू केले. त्यातून त्याच्या लक्षात आले की, जगातील प्रत्येक देशाच्या संस्कृतीत गाईला काही स्थान आहे आणि भारतीय संस्कृतीत तर गाईला देवतेचे स्थान आहे. हा सारा विषय कसा मांडावा, असा विचार करताना त्यांना त्या गाेमांसाच्या दुकानात जनावर कसे कापावे आणि त्याचे गिऱ्हाईकासाठी तुकडे कसे करावे यावर एक चित्रमालिका हाेती.
 
त्या चित्राकडे बघूनच त्याने चित्रकला शिकण्यास आरंभ केला.चित्रकलेची काही पुस्तके पाहिली.त्याच्या आधारे त्याला ती कला आत्मसात झाली. काेणतेही चित्र हे त्यातील आशयाने लाेकांना आवडते हेही त्याच्या लक्षात आले. त्याने प्रथम आि्रकेतीलच विषय निवडला. घानात सध्या मुलामुलींच्या लग्नाबाबत अशी स्थिती आहे की, लग्नाच्या मुलांकडे जर चांगल्या गाई असतील आणि ताे त्यातील काही गाई वधुपित्याला देण्यास तयार असेल तर चांगली वधू मिळते.हे चित्र अमेरिकेत चांगल्या किंमतीत गेले. त्याने दुसरा विषय निवडला की, जगातील महिला आणि गाई यांचे फार हाल हाेत असतात.जगात प्रत्येक देशात गाय संस्कृतीला जन्म देते पण एवढे माेठे जग गाईचा वापर गाेमांसासाठीच करतात. त्याला प्रत्येक देशातील गाईच्या संस्कृतीवर चित्रे काढायची आहेत. प्रामुख्याने गाईला देवता मानणाऱ्या भारतातील गाईबाबत त्याला अधिक अभ्यास करून चित्रे काढायची आहेत.