गाेविज्ञान संशाेधन संस्था आणि गाेसेवा या गाईबाबत काम करणाऱ्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यकावर संशाेधन व यशस्वी प्रयाेग केलेले डाॅ.संताेष गटणे यांनी सांगितले की, या साऱ्या समस्यांना उत्तरे देण्याचे मार्ग हे साेपे, स्वस्त आणि काेणालाही करता येण्यासारखे आहेत. (भाग : 1476)
याचे उत्तरच द्यायचे झाले, तर प्रत्येकाने जर दरराेज देशी गाईचे साडेतीनशे मिली दूध घेतले, तर आपले पाेषण नीट हाेईल, प्रकृती अधिक कार्यक्षम हाेईल आणि औषधाच्या गरजा वेगाने कमी हाेतील.सध्या प्रत्येक घरी औषधांचे खर्च हे अन्नखर्चापेक्षा अधिक आहेत. त्या तुलनेत देशी गाईच्या साडेतीनशे मिली दुधाचा खर्च कमीच असणार. सध्या शहरी भागात असे दूध विश्वासाने मिळणे साेपे नाही, तरीही आता अनेक ठिकाणी साेय झाली आहे. पण, शहरांच्या उपनगर भागात आणि ग्रामीण भागात ते शक्य आहे.पहिले काही दिवस या सल्ल्यावर विश्वासही बसणार नाही. म्हणून थाेडेथाेडे दूध मिळवणे व त्याचा परिणाम बघणे अशा दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.गाेआधारित शेतीबाबत हाच प्रयाेग सध्या केला जाताे. गेल्या साठ वर्षांची रासायनिक खतांची किंवा उग्र औषधे घेण्याची सवय एकदम जाणार नाही; पण देशाच्या एकाच भागात गाेआधारित शेतीचा प्रयाेग केला, तर त्याची प्रचिती येते.
अवघ्या दहा किलाे शेणात एक एकर शेतीचे खत तयार हाेते, ही बाब स्वस्तातील असल्याने त्यावर प्रथम विश्वासही बसत नाही. अर्थात दहा किलाे शेणाच्या शेतात घालायचे अमृतपाणी तयार करायला अजून काही बाबींची जाेड द्यावी लागते. पण, हे सारे शेतीत आवश्यकच असते. पण, ही पद्धत फक्त स्वस्त आहे असे नव्हे, तर त्या त्या शेतीतील गेल्या साठ वर्षांचे नष्टचर्य घालवणारी आहे. देशी गाईच्या दुधाची वापराचीही स्थिती तीच आहे.तरीही आता दुधासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.गेल्या दहा वर्षांत देशी गाईंची संख्या वेगाने वाढते आहे. पण, एकुणात विचार केला, तर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लाेकसंख्या तीनपट वाढली आहे आणि देशी गाईंची संख्या एकतृतीयांश झाली आहे. ही दाेन्ही अंगाने समस्या आहेतच; पण सध्या जेवढे गाेधन उपलब्ध आहे आणि जेवढी लाेकसंख्या आहे, त्यातूनच जर ही समस्या साेडवायला आरंभ केला, तर पूर्णपणे यशाचा दिवसही दूर नाही.