जनावरांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आधुनिक उपचारही आवश्यक आहेत आणि पारंपरिक उपचारही आवश्यक आहेत. काही बाबींवर पारंपरिक उपचार अधिक प्रभावी आहेत, पण ते उपाय दुर्लक्षित हाेतात. (भाग : 1472)
काही माेठ्या समस्या पारंपरिक उपचारांनी सहजपणे सुटू शकतात. त्या समस्या म्हणजे गाजरगवत, रासायनिक खतावर आलेली वैरण जनावरांना घालणे.त्यातील एक समस्या तेवढीच उग्र आहे ती म्हणजे माणसांच्या राेगावरील जहाल औषधे. हे प्रकार तीन प्रकारची जागतिक महायुद्धेच आहेत. तीनही माध्यमांतून साैम्य प्रमाणात विषांचा अंश येत असल्याने दरराेज थाेडा थाेडा किंवा दर वर्षाला थाेडा थाेडा त्याचा परिणाम हाेत राहताे.सध्या आपण काेराेनाचा सामना करत आहाेत, त्यामुळे या समस्यांवर विचार करायला आपल्याला सवडही नाही.काेराेना हीसुद्धा साथ आहे की, जागतिक महायुद्ध आहे, यावर चर्चा सुरू आहे, पण निष्कर्ष पुढे येत नाहीत. वास्तविक, जैविक विषाणू आणि कृत्रिम विषाणू शाेधणे हे सध्या विज्ञानाला अवघड नाही.
अनेक देशांनी आपापली संशाेधने तयारही ठेवली आहेत, पण काेराेनाच्या महामारीतून बाहेर आल्याखेरीज त्यावर काेणी चर्चा करेल, असे दिसत नाही. वरील तीन उग्र समस्यांतील गाजरगवत, रासायनिक खते आणि उग्र औषधांचे परिणाम या गेल्या साठ वर्षांतील समस्या आहेत. या तीनही बाबींतील समान घटक म्हणजे प्रगत देशांत वरील तिन्हींवर बंदी तर आहेच, पण एखादी काडी जरी सापडली तरी त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येते. अलीकडे आपण युराेपातही भाजीपाला, फळे आणि फुले निर्यात करताे. त्यांची वाढ जर रासायनिक खतावर असेल किंवा त्यावर रासायनिक कृमिनाशके वापरली असतील तर ताे माल परत पाठविला जाताे आणि पाठवणारी व्यक्ती किंवा कंपनी ब्लॅक लिस्टेड केली जाते.
युराेपीय लाेक किती जागृत आहेत, याबाबत आपल्याकडे काैतुक केले जाते, पण ती कृमीनाशके, रासायनिक खते आणि गाजरगवत हे सारे त्यांनीच आपल्या देशांची अर्थव्यवस्था उभीच न राहू देण्यासाठी पुरस्कृत केले हाेते, याचा आपल्याला विसर पडताे.ज्या बाबी आपल्याकडे त्यांनी पन्नास साठ वर्षे पाठवल्या, त्याच बाबी आि्रकेत शे-सव्वाशे वर्षे पाठवल्या. त्या देशांची काय स्थिती झाली आहे हे आपण बघताेच.ज्या युराेपीय महासत्तांनी जगावर पाचशे वर्षे सत्ता करून त्यांची लूट आणि पिळवणूक केली आहे, ताे प्रकार त्यांनी साहजिकच पुढे चालू ठेवायचा आहे.