जनावरांची तपासणी करण्याची सध्याची जी पद्धती ती आहे, त्यात मूलभूत सुधारणा हाेण्याची गरज आहे. सध्या दूध देणाऱ्या जनावरांची तपासणी करून घेण्याची जी पद्धती आहे, ती जनावरांच्या मालकाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
(भाग : 1470)
जनावरांना हाेणारे टीबी, ताेंड आणि पायाचे राेग, स्तनदाह या तर समस्या महत्त्वाच्या आहेतच, पण अलीकडे ही जनावरे गाजरगवत म्हणजे काॅंग्रेस गवत खात असल्याचे निदर्शनास आले. त्या गवतातील दाेष दुधात उतरतात आणि त्यामुळे माणसांच्याही प्रकृतीवर विपरीत परिणाम हाेतात.गाय आणि म्हैस ही दूध देणारी जनावरे असल्याने त्याला व्यावसायिक मूल्य आहे. त्यामुळे ते जनावर कमी दूध देऊ लागले की, ते पशुवैद्यकाकडे नेल जाते. त्यातही आयुर्वेदीय औषधे देणारे पशुवैद्यक कमी आहेत. त्यात जे आहेत ते गावांतील वृद्ध व्यक्ती किंवा आजीबाई अशी स्थिती आहे.या जनावरांचे राेग जाेपर्यंत प्राथमिक स्थितीत असतात, ताेपर्यंत अॅलाेपॅथीतील पशुवैद्यकीय औषधेही फार त्रासदायक ठरत नाहीत, पण त्यांचा मधुमेह, टीबीवरील औषधे दुधावर परिणाम करतात, ताे परिणाम दूध वापरणारांच्या लक्षातही येणे शक्य नसते.
त्यात तापासारख्या स्थितीत अँटिबायाेटिक आणि स्टेराॅईडचा वापर केला जाताे. अँटिबायाेटिक हे असे औषध आहे की, त्याचा केवळ त्या जनावराच त्रास हाेताे असे नव्हे, तर त्यातील काही घटक रेसिड्यू-दुधात, शेणात आणि मूत्रातही उतरतात. त्या जनावरांचे दूध प्यायल्यावर ते माणसाला तर त्रासदायक हाेतातच, पण माणसाच्या मलमूत्रातून जातात. ती नदीचे पाणी दूषित करतात.अर्थात, नद्यांचे वाहते पाणी दूषित हाेण्याचा ताे एकमेव मार्ग नाही.माणसेही जेव्हा अँटिबायाेटिकची औषधे घेतात, तेव्हाही ही समस्या येतच असते, पण या साऱ्या समस्यांकडे बघणारी सध्या काेणतीही यंत्रणा नाही. युराेप-अमेरिकेतील देश याकडे बारीक लक्ष देतात, त्यांची आणि आपली तुलना हाेऊ शकत नाही.कारण त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती जगातील अन्य देशांना पाचशे वर्षांपर्यंत लुटून निर्माण झाली आहे, पण गरीब देश या समस्यांचे बळी ठरतात.