गाेहत्येचे रूपांतर गाेदानात, गाेपूजनात हाेणे शक्य

    10-Aug-2021   
Total Views |
 
 
मुस्लिम समाजात राष्ट्रीय मुस्लिम मंचामुळे त्यावर व्यापक स्वरूपात विचार सुरू झाला आहे. त्यामुळे यापुढे ते कार्यकर्ते आणि गाेसेवा विभागाचे कार्यकर्ते मिळून या विषयाचा प्रचार करणार आहाेत, असे या प्रसंगी पंजाब गाेसेवा विभागाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सांगितले. (भाग : 1469)
 

cow_1  H x W: 0 
 
सर्वसाधारणपणे मुसलमान धर्मीयांच्या ईद या सणादिवशी बळी देण्याची प्रथा आपण वर्षानुवर्षे ऐकताे आहाेत, पण या वर्षी गाय-बैलाचा बळी याऐवजी गाेदान असा उपक्रम पुढे आला आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमात देशभर अनेक ठिकाणी हा उपक्रम झाला. याचा आरंभ एक परर्शियन भाषेचे विद्वान इम्रान चाैधरी आणि शिराज कुरेशी यांनी हैदराबाद येथील एका गाेशाळेत गाेदान केले. त्या वेळी पंजाब गाेसेवा विभागाचे अध्यक्ष सतीश कुमारही हजर हाेते.या प्रसंगी कुरेशी म्हणाले, ‘कुर्बानी याचा मूळचा अर्थ त्याग असा आहे. अनेक कारणांनी ताे जनावरांचा त्याग म्हणजे हत्या अशाप्रकारे घेतला गेला. वास्तविक, हा अहंकाराचा त्याग असा त्याचा आशय आहे. म्हणून आम्ही आज गाेदान करून अहंकाराचा त्याग करत आहाेत.’ इम्रान कुरेशी हैदराबादचेच आहेत. ते म्हणाले, ‘हा कार्यक्रम फक्त हैदराबाद आणि दिल्ली येथे हाेताे आहे असे नाही, तर देशभर अनेक ठिकाणी हाेत आहे. आपण आपल्या मनातील सैतानी वृत्तीची कुर्बानी करत आहाेत.
 
हा अर्थ जेव्हा सर्वत्र समजेल तेव्हा जेथे सध्या कुर्बानीला पशुहत्या हाेते आहे, तेथे पशुदान ही प्रथा सुरू हाेईल.’ कुराणात अनेक ठिकाणी गाईचे आणि गाईच्या दुधाचे गाैरवपर वर्णन आले आहे. हे लक्षात घेऊन आणि भारतातील गाेपूजनाची परंपरा लक्षात घेऊन गाेहत्येचे रूपांतर गाेदानात आणि गाेपूजनात हाेईल, असे आता दिसू लागले आहे. अर्थात, त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागेल. सध्या मुस्लिम समाजातील सुज्ञ आणि ज्ञानी लाेक आहेत, त्यांना हा विषय समजू लागला आहे, पण अजूनही त्याला माेठे स्वरूप आलेले नाही. येणाऱ्या काळात हा उपक्रम केवळ भारतातच नव्हे, तर अन्य देशांतही पाेहाेचेल. आपल्या मनातील दाेषांची कुर्बानी हा जाे कुराणातील अर्थ आहे, हा समाजात माेठ्या प्रमाणात स्वीकारार्ह झाल्यास भारतातील सामाजिक साैदार्ह वाढीस लागेल.मुस्लिम समाजात राष्ट्रीय मुस्लिम मंचामुळे त्यावर व्यापक स्वरूपात विचार सुरू झाला आहे. त्यामुळे यापुढे ते कार्यकर्ते आणि गाेसेवा विभागाचे कार्यकर्ते मिळून या विषयाचा प्रचार करणार आहाेत, असे या प्रसंगी पंजाब गाेसेवा विभागाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सांगितले. या प्रसंगी शीख समाजातील शिखसंत मंडळीही हजर हाेती.