‘गाईची काळजी घ्या’ याेजनेत अमेरिकेत 17 लाख मुलांचा सहभाग

    08-Jul-2021   
Total Views |
 
 
एका गाईचे एक वासरू किंवा कालवड एका मुलाला देणे आणि त्याने त्याचे शिक्षण हाेईपर्यंत दरराेज अधिकाधिक काळ त्या छाेट्या गाेवंशाच्या बराेबर घालवणे हा एक समृद्ध अनुभव आहे.(भाग : 1436)
 

cow_1  H x W: 0 
 
‘एका गाईची काळजी घ्या’ या कार्यक्रमात जगातील सतरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.जागतिक पातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळालेली ही माेहीम ‘डेअरी एक्स्लन्स फौडेशन’ या अमेरिकेतील संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. ही याेजना प्रामुख्याने शालेय मुलांसाठी आहे. या याेजनेची मूळ कल्पना अशी की, शाळेची वेळ व अभ्यास सांभाळून आपल्या घराजवळीलडेअरीमध्ये जाऊन एका गाेवंशाची आणि त्यातही छाेट्या वासराची किंवा कालवडीची काळजी घेणे.तिने व्यवस्थित चारा खाल्ला आहे का, तिची प्रकृतीची काय अडचण आहे, याबराेबरच गाईला गाेंजारणे आणि गाईच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ असणे याचा त्यात समावेश आहे. पण, काेविडमुळे यात बदल करण्यात आला आहे. मुलांची थाेड्या वेळासाठी त्यातील छाेट्या जनावरांशी भेट आणि नंतर त्यांच्याशी ‘ऑनलाइन’ संबंध.दिसताना अगदीच साधी वाटणारी ही याेजना कमालीचा प्रतिसाद देणारी ठरली आहे.अमेरिकेतील पन्नास राज्ये, याचबराेबर जगातील 45 देश या माेहिमेत सहभागी झाले आहेत. त्यात एकूण ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, काेस्टारिका, फ्रांस, जर्मनी, मेक्सिकाे, दक्षिण आि्रका आणि काही देशांचा समावेश आहे.
 
यात दूध देणारी गाय असणारे गाेठे आणि दुग्धालये यांचा पुढाकार माेठा आहे. एकूण 71 हजार शालेय वर्गांनी त्यात संघटितपणे भाग घेतला आहे. विद्यार्थ्यांबराेबर त्यांची कुटुंबे, स्काऊट संघटना, नर्सिंग हाेम्स, लायब्ररी गट अशा अनेक प्रकारच्या संघटनांचा त्यात समावेश आहे. सर्वसाधारणपणे असा अनुभव असताे की, गाय दत्तक घेण्याबाबतचा अनुभव हा भारतात येताे.पण, हा प्रकल्प अमेरिकेतील आहे. त्याला जगातील अनेक देशांतील शाळा आणि विद्यार्थी यांनी प्रतिसाद दिला आहे.गेल्या एका वर्षात हा कार्यक्रम पंधरापट वाढला आहे. डेअरी एक्स्लन्स फ़ौडेशनच्या संचालिका ब्रिटनी स्निडर यांनी सांगितले की, लहानपणी गाईबराेबर अधिकाधिक वेळ घालवलेल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व निराळे असते. एका गाईचे एक वासरू किंवा कालवड एका मुलाला देणे आणि त्याने त्याचे शिक्षण हाेईपर्यंत दरराेज अधिकाधिक काळ त्या छाेट्या गाेवंशाच्या बराेबर घालवणे हा एक समृद्ध अनुभव आहे. माेठ्या काऊ ार्ममधून गाई माेकळ्याच असतात. तेव्हा त्यांच्या पाठाेपाठ हिंडणे हे त्यांना फार आवडते.