डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांचे संस्मरणीय शताब्दी वर्ष

    06-Jul-2021   
Total Views |
 
 
शंभर वर्षांपूर्वी जर भारतात रासायनिक शेती सुरू झाली असती, तर भारताची स्थिती अधिक खराब हाेऊन ती आज जी  आफ्रिकेची स्थिती आहे, तशी झाली असती.ब्रिटिशांना तेच अपेक्षित हाेते.डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांना त्यासाठी भारतात पाठविले. (भाग : 1434)
 

Albert Howard_1 &nbs 
 
 
भारतीय शेतीचा गाैरव इंग्लंडच्या राणीला कळविणारे इंग्रज वैज्ञानिक डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांचे भारतीय कृषिशास्त्राचा अभ्यास करण्याचे हे शताब्दी वर्ष आहे. भारतीय कृषिशास्त्राच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वाची घटना आहे. त्यांनी शंभर वर्षापूर्वी त्यांना भारतात ब्रिटिशांच्या रासायनिक शेतीचा प्रचार करण्यासाठी भारतात पाठविले हाेते.ब्रिटिशांचा हेतूच असा हाेता की, ब्रिटिश साम्राज्यात कापूस, ज्यूट, तंबाखू, अू अशी जी शेती उत्पादने लागतील ती भारतात तयार करून घ्यावीत. त्याची एकाधिकार पद्धतीने अतिशय कमी किमतीने खरेदी करावी आणि ती ब्रिटनला न्यावी. ब्रिटिश साम्राज्याला लागणारी कापडाची गरज भारतातील कापसाने भागत हाेती. मँचेस्टरच्या बहुतेक गिरण्या भारतीय कापसावर चालत असत. शंभर वर्षांपूर्वी जर भारतात रासायनिक शेती सुरू झाली असती, तर भारताची स्थिती अधिक खराब हाेऊन ती आज जी आफ्रिकेची स्थिती आहे, तशी झाली असती.ब्रिटिशांना तेच अपेक्षित हाेते. डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांना त्यासाठी भारतात पाठविले.भारतात आल्यावर त्यांनी येथील देशभर प्रवास करून शेतीचा अभ्यास केला.
 
तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, येथे अनेक शतके गाेआधारित शेती पद्धती आहे. ती पद्धती अतिशय समृद्ध तर आहेच; पण त्यापासूनच जगाने शिकावे, अशी स्थिती आहे. त्यावर आधारित त्यांनी जे पुस्तक लिहिले त्याला ‘अ‍ॅन अ‍ॅग्रीकल्चरल टेस्टामेंट’ असे नाव दिले आहे. युराेपात काेणत्याही पुस्तकाला जेंहा टेस्टामेंट असे नाव दिले जाते, तेव्हा त्याची तुलना बायबलशी केलेली असते. ते पुस्तक लिहिल्यावर त्याने ब्रिटनच्या राजाला कळविले हाेते की, भारतीय कृषिशास्त्र हे या पृथ्वीतलावरील सर्वांत समृद्ध कृषिशास्त्र आहे. त्याबाबत ब्रिटिशांचा दृष्टिकाेन निराळाच आहे. पण, त्या कृषिशास्त्राचे काैतुक करण्याचे औदार्य ब्रिटनमध्ये नसले, तरी त्याची कुचेष्टा हाेऊ देऊ नका.याचा परिणाम असा झाला की, ब्रिटिशांच्या काळात त्यांनी येथील शेती रासायनिक खतांची शेती व्हावी, असा प्रयत्न केला; पण त्यावर फार भर दिला नाही. पण, त्यातील प्रचंड विराेधाभास असा की, स्वातंत्र्य मिळाल्यावर येथे साठ वर्षे ज्या सरकारने राज्य केले. त्यांनी युराेपीय रासायनिक खतांचा वापर करून शेतीची दुरवस्था केली. माेरेश्वर जाेशी, 9881717855