गाईच्या वाळलेल्या शेणीवर अर्धा चमचा तूप घालून जर घरात त्याचा धूप केला, तर घरातील बारीक किडे नाहीसे हाेतात, हा सर्वांचा अनुभव आहे. (भाग : 1433)
अशाच पद्धतीने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने केरळमधील औषध पद्धतीनुसार एक ‘अपराजिता धूम चूर्ण’ नावाचा धूप तयार करण्यात आला आहे.देशभर त्याचा वापर सुरू आहे, तरीही केरळमध्ये अगदी सार्वजनिक ठिकाणीही त्याचा वापर सुरू आहे. अर्थातच तेथे मार्क्सवादी पक्षाचे सरकार असल्याने तेथे त्याला विराेधही हाेत आहे आणि प्रसारमाध्यमातून दाेन्ही बाजूंनी चर्चाही हाेत आहे. अडीच लाख लाेकसंख्या असलेल्या तिरुअनंतपुरम् जिल्ल्ह्यातील अलेप्पी या नगरपालिकेला याचा चांगलाफायदा झाला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पर्यटकांचे शहर आहे.त्या शहराला स्वतंत्र माेठा समुद्रकिनारा आहे. त्याचा शहरालाफायदा हाेताे; पण केर कचराफार हाेताे. या धुपामध्ये एक पावडर असते. ती पावडर स्वतंत्रपणे किंवा गाईच्या शेणीवर ठेवून त्याला पेटवले, तर त्याचा धूर सर्वत्र पसरताे. त्यामुळे साऱ्या परिसरातील दूषितता जाते. केरळ हे असे राज्य आहे की, ते संपूर्ण राज्य हे शहर आणि खेडी यांची एकत्र वस्ती आहे. तेथे शेतीसाठी स्वतंत्र भाग नाही.घराभाेवतीची व्यापक जागा आणि तळी म्हणजे शेती अशी स्थिती आहे.
तरीही माेठी शहरे आणि माेठी नगरे ही वाहनामुळे अधिक प्रदूषित असतात.यावर्षी सगळीकडेच काेविडचा फैलाव हाेता. त्यातही केरळात ताे अधिक हाेता. त्यामुळे अपराजिता धूम चूर्णाने संसर्गाच्या शक्यतेचा तणाव कमी केला.यावरील संशाेधन तसे जुने आहे आणि ‘एन्शंट सायन्स ऑफ लाईफ’ या विज्ञान नियतकालिकात त्यावर इ.सन 2007 मध्ये अभ्यास निबंध येऊन गेला हाेता.केरळमध्ये आयुर्वेदिक संस्थांची संख्या माेठी आहे आणि अनेक पारंपरिक औषधे तेथे तयार हाेत असतात. अनेक आयुर्वेदिकफार्मसींची औषधे देशभर तर जातातच आणि केरळीय औषधांची उपचार केंद्रेही असतात. या धुपाचा जाे व्यापक अभ्यास करण्यात आला, त्यात राष्ट्रीय आयुष मिशनच्या डाॅ. सलजा कुमारी आणि जिल्हाधिकारी एस. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तेरा अभ्यासकांचा एक गट तयार करण्यात आला हाेता.त्यांचे निष्कर्ष असे आले की, त्या त्या भागातील संसर्ग पंचाण्णव ते नव्याण्णव टक्क्यांनी कमी झाला आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855