आशियाई देशात आयुर्वेदही आहे आणि गाेविज्ञान संस्कृतीही आहे. काेविडच्या काळात आणि त्या पूर्वीही अनेक व्याधीबाबत त्याचा वापर झाला आहे.एखाद्या बाबीला पाश्चात्त्य विज्ञानाची मान्यता नसेल, तर ते जगभर स्वीकारले जात नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर त्यांचे आर्थिक साम्राज्य उभे आहे. (भाग : 1459)
आशियाई देशात आयुर्वेदाला थाेडे जरी यश मिळाले तरी ‘ते कसे घातक आहे’ या पातळीवर पाश्चात्त्य देश चर्चा सुरू करतात. त्यामुळे आशियातील पारंपरिक वैद्यकावर सध्या ‘ऑनलाइन’ आणि नंतर माेठ्या परिषदा घेऊन चर्चा सुरू करणे आवश्यक आहे.
भारतात शंभरपेक्षा अधिक आयुर्वेद संस्था आणि एक हजारापेक्षा अधिक वैद्य यांनी स्वतंत्रपणे आणि एकत्रही उपचार करून काेराेनावर यश मिळवले आहे. बन्सी संस्थेनेच साडेचार लाख लाेकांवर उपचार केले आहेत. शेतीच्या संदर्भात त्या संस्थेच्या गाे-कृपाअमृतामुळे त्यांचे नाव देशभर झाले आहे. त्यामुळे त्यांच्या ‘काेविड-19’ औषधांचाही व्यापक स्वीकार झाला आहे.काेविडवरील त्यांच्या औषधांचे प्रमुख घटक आहेत, ते गाेमूत्राच्या भावना दिलेली गुळवेल, शामतुळशी (काळी तुळस), कडूलिंब, त्याच बराेबर शेवग्याच्या शेंगा आणि त्या झाडाचा पाला.
काेराेनाच्या काळात अजून एका बाबीची जाणीव झाली आहे की, ज्यांना हृदयविकार, मूत्रपिंडाचा त्रास, मधुमेह हा त्रास आहे, त्यांना काेविड झाल्यास आयुर्वेद किंवा अॅलाेपॅथी यांचा उपचार झाल्याने ती व्याधी बरी हाेते; पण नंतर तीच व्याधी उचल खाते व त्या व्यक्तीला धाेका निर्माण हाेताे.त्यासाठी वरील त्रास असणारांनी आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, यातील बारकावे पुढे दिलेले आहेत; पण त्यांनी आहारात मुगाचे प्रमाण वाढवावे.श्रीलंका देशाने तर आयुर्वेद ही त्यांची राष्ट्रीय उपचार पद्धती केली आहे. त्याचबराेबर ब्रह्मदेश, नेपाळ, थायलंड, व्हिएतनाम, लाओस, कंबाेडिया या देशात या पद्धतीचा स्थानिक फरकाने वापर हाेत आहे. तिबेटमध्ये अगदी साठ वर्षापूर्वीपर्यंत दलाई लामा आणि पंचमलामा यांच्या नियंत्रणाखालील वैद्यक परंपरा हाेत्या.मलेशिया आणि इंडाेनेशिया या मुस्लिम देशात आजही आयुर्वेद परंपरा वापरात आहेत. आपल्याला जपान, काेरिया आणि चीन हे देश लांबचे वाटतात; पण त्यांच्याकडेही या परंपरा आहेत. भारतात गेली एक हजार वर्षे आयुर्वेद न मानणाऱ्यांची सत्ता असल्याने आयुर्वेदाचे महत्त्व कमी झाले आहे. समाजातील पंधरा वीस टक्के लाेक आयुर्वेद घेतात, पण त्यांचाही ओढा अॅलाेपॅथीकडेच असताे.