भारतीय वैद्यकावर व्यापक चर्चा सुरू केली पाहिजे

    30-Jul-2021   
Total Views |
 
 
काेराेनाच्या निमित्ताने पारंपरिक भारतीय औषधांची प्रचिती आली, तर ती प्रचिती घेणे असेच चालू ठेवावे. घरातील आणि समाजातील बहुतेकांना काही ना काही त्रास हाेत असताे. प्रत्येकाने आयुर्वेदाची किंवा गाेविज्ञानाची पुस्तके पाहावीत.(भाग : 1458)
 
 

yoga_1  H x W:  
 
त्यातील आजाराचे स्वरूप माेठे असेल, तर ती औषधे घेताना जाणकारांचा सल्ला घ्यावा; पण पूर्वी घरात आजीबाईंचा बटवा असे. त्यावरील पुस्तके आजही उपलब्ध आहेत. ती औषधे घेणे सुरू ठेवले, तरी राष्ट्रीय वैद्यकाचा वापर वाढेल.याेगाभ्यासाबराेबर घरातील स्वच्छता, आहार आणि दिनचर्या यातूनच बरेच अंतर कापले जाईल. पूर्वी घरात येताना आपले हातपाय धुणे अत्यावश्यक असायचे. गेल्या पन्नास साठ वर्षांत त्या बाबी कालबाह्य वाटू लागल्या आहेत. आता पुन्हा त्याची प्रचिती येऊ लागली आहे. येणाऱ्या काळात काेराेना गेला, तरी त्याची सवय साेडू नये.गेल्या वीस वर्षांत हाॅटेलचे खाणे फार वाढले हाेते. त्यावरही आपणहून मर्यादा घालून घ्यावी. याेगाभ्यासाचा उपयाेग तर राेग बरे हाेण्यापलीकडे शरीर, मन, बुद्धी आणि आध्यात्मिक विकास यांच्यासाठीही आहे.यासाठी आवश्यक आहे ते काेराेनाचा काळ सुरू असताना दहा-पाच जणात त्यावर ऑन लाइन चर्चा करणे कारण काेरानाने आपल्या देशाचे आणि साऱ्या जगाचे एवढे नुकसान केले आहे की, जीवनशैलीतील सुधारणा हा महत्त्वाचा भाग हाेऊन राहिला आहे.
 
बन्सी गीर गाेशाळेचे यावरील पन्नासाहून अधिक व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. ते ऐकले तरी गाेवैद्यकाबाबत अनेक शंकांचे निरसन हाेईल. सध्या तर पतंजली याेगपीठ संस्थेने हे सर्व विषय इंटरनेटवर टाकले आहेत. त्या गाेवैद्यकाला प्राधान्य नाही, तरीही माहिती महत्त्वाची आहे. गुळवेलची माहिती जवळजवळ दाेन हजार शब्दांत माहिती आहे. अजूनही अनेक आयुर्वेदिक संस्था आणि विकिपिडिया यांनी यावर माहिती दिली आहे. यातील गुळवेल हे फक्त उदाहरण आहे.पतंजली संस्थेने प्रत्येक आसनाची आणि प्राणायाम पद्धतीची ज्याप्रमाणे माहिती दिली आहे, त्याप्रमाणे सर्व आयुर्वेद वनस्पती आणि त्यांचे उपयाेग यांची माहिती आहे. दाेन महिन्यांपूर्वी आपल्यापैकी अनेकांनी ऑक्सिजन, हाॅस्पिटलमधील काेविड बेड आणि रेस्पिरेटर शाेधण्यासाठी जेवढे परिश्रम घेतले, त्यामानाने फक्त दाेन-तीन टक्के परिश्रम जरी या वनस्पतीचे गुणधर्म शाेधण्यास आणि त्याचा उपयाेग करून घेण्यास केले, तर ऑक्सिजनची वेळच येणार नाही.