काेविड लस घेण्यासाठी गाय आणि नाेकरी यांचेही आकर्षण

    03-Jul-2021   
Total Views |
 
 
लाेक लसीला घाबरत आहेत.ही स्थिती फक्त भारत आणि फिलिपिन्समध्ये असे नाही, तर सर्व देशात आहे. अमेरिकेतही ही लस टाेचून घेणाऱ्याला दहा लाख डाॅलरच्या लाॅटरीचे तिकीट देण्यात येत आहे. (भाग : 1431)
 
 
cow_1  H x W: 0
भारतात ग्रामीण भागात अनेकजण काेविडची लस घेण्यास घाबरत असल्याचे जसे चित्र आहे तीच स्थिती अनेक देशांत आहे. अमेरिकेत आणि दक्षिण अमेरिकेतही हीच स्थिती आहे. दहा लाख डाॅलर्सचे लाॅटरी तिकीट मिळेल, यापासून ते नाेकरी मिळेल, असेही आकर्षण आहे.फिलिपिन्स या देशाची स्थिती गंभीरही आहे आणि गंमतशीरही आहे. त्या देशाची लाेकसंख्या एक काेटी आठ लाख आहे.त्या देशाने अडीच काेटी लस मागवून ठेवल्या आहेत आणि येण्यासही सुरुवात झाली आहे. तरीही लाेकच त्याकडेफिरकत नाहीत अशी स्थिती आहे.लाेकांना लसीसाठी प्रेरित करण्यासाठी ‘लस घेतल्यास एक गाय’ असे आकर्षण पुढे केले आहे.फिलिपिन्सची राजधानी मनिला या शहरापासून पन्नास किमी अंतरावरील पंपगा या विभागातील ‘सान लुईस’ या गावातून यातील पहिली बातमी पुढे आली आहे.
 
फिलिपिन्सच्या ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर गरिबी आहे.त्यामुळे एक गाय मिळणे ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे.
या मागणीला तेथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाईची किंमत स्थानिक पातळीवर 628 डाॅलर्स आहे. अजूनहीफिलिपिन्समध्ये शेतीसाठी आणि शहरात वाहतुकीसाठी बैलाचा वापर केला जाताे आणि ग्रामीण भागात गाय ही शेती आणि दूध यासाठी अतिशय भरवशाचे साधन असते. 6 जूनपर्यंत त्या देशातील एक काेटी दहा लाख लाेकसंख्येपैकी फक्त पाच लाख लाेकांनी वॅक्सिनचा पहिला डाेस घेतला हाेता आणि त्यापैकी फक्त सात लाख लाेकांनी दुसरा डाेस घेतला आहे. तेथील प्रत्येकाला पहिला आणि दुसरा डाेस मिळाला पाहिजे, असा तेथील सरकारचा प्रयत्नही आहे आणि तयारीही आहे.
 
पण, ताे घेण्यासाठी लाेकांनाच भीती वाटते आहे. पहिल्या डाेसच्या वेळी लाेकांना डाेसच्या आधी भरपूर अल्पाेपहार, घरगुती उपयाेगाच्या वस्तू देण्यात येतात, तर लस घेणे पूर्ण झाल्यावर अजून काही व्यक्तिगत उपयाेगी वस्तूंचा वर्षाव करण्यात येताे. त्यामुळे नारिकांतही अधिक काही तरीची मागणी वाढत चालली आहे.तरीही काेविड लसीला फार काही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे नाही. लाेक लसीला घाबरत आहेत. ही स्थिती फक्त भारत आणिफिलिपिन्समध्ये असे नाही, तर सर्व देशात आहे. अमेरिकेतही ही लस टाेचून घेणाऱ्याला दहा लाख डाॅलरच्या लाॅटरीचे तिकीट देण्यात येत आहे.