पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयाेगशाळेचे निवृत्त शास्त्रज्ञ डाॅ. प्रमाेद माेघे म्हणाले, गाेमूत्र आणि गाेवंशाचे शेण यावर भारतात आणि परदेशातही माेठे संशाेधन झाले आहे. त्यात एकूण सहा पेटंट मिळाली आहेत. (भाग : 1457)
राज्यातील तीनशे गाेशाळांमध्ये पुणे महानगर गाेसेवा समितीच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 292 गाेशाळांमध्ये काम करणाऱ्या एकालाही काेराेना झाला नाही, असे निष्कर्ष पुढे आले आहेत. याबाबत माहिती देताना पुणे महानगर गाेसेवा समितीचे संयाेजक गिरीश वैकर यांनी सांगितले की, या तीनशे गाेशाळांत एकूण अठराशे पंचाण्णव लाेक काम करतात. हे गाेशाळेतही काम करतात आणि बाहेरही जात येत असतात. त्यांच्यापैकी फक्त 14 लाेकांना काेराेनाची लागण झाली. काेराेनाची लागण न झाल्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. याबाबत जे शास्त्रीय संशाेधन झाले आहे, त्याची माहिती देताना पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयाेगशाळेचे निवृत्त शास्त्रज्ञ डाॅ. प्रमाेद माेघे म्हणाले, गाेमूत्र आणि गाेवंशाचे शेण यावर भारतात आणि परदेशातही माेठे संशाेधन झाले आहे. त्यात एकूण सहा पेटंट मिळाली आहेत. गाेमूत्रात व्हाेलाटाईल ऑरगॅनिक आणि फेनाॅलिक कंपाउंड असल्याने ते अँटिव्हायरल डिस्इन्क्टंट म्हणून काम करत असण्याची शक्यता आहे.
भारतात अॅलाेपॅथी हे राष्ट्रीय वैद्यक आहे. त्यामुळे काेणत्याही बाबीसाठी त्याचा आधार अधिकृत मानला जाताे.त्याचा दुसरा परिणाम असा की, त्यातील आर्थिक उलाढालींना माेठे महत्त्व आहे.काेणतीही आयुर्वेदाची बातमी आली की, ती कशी अविश्वसनीय आहे, यावरच अॅलाेपॅथीच्या कंपन्यांचे लाेक विधाने करत असतात. गाईच्या शेणावर पाय ठेवून उभे राहिले तरी शरीर प्रकृती सुधारते, असा अनुभव आहे. गाईच्या शेणाच्या लेपनाने अर्धांगवायू आणि पार्किंन्सन डिसीज या व्याधी बऱ्या झाल्याची उदाहरणे तर आहेतच; पण त्याचे उल्लेख माेठमाेठ्या ग्रंथात आहेत.याच संदर्भात चीनमधीलही एक अनुभव लक्षात ठेवण्यासारखा आहे.तेथील चाळीस टक्के जनता ही गाेपूजक आहे. बाैद्ध धर्मात भगवान गाैतम बुद्धांचे असे विधान केले आहे की, जी व्यक्ती या जन्मी पुण्य करेल, त्या व्यक्तीला पुढील जन्मी ‘गाेवंशाचा जन्म मिळेल.’ यातील दुसरा भाग भाग म्हणजे तेथील पंचागांत विद्यमान वर्ष हे ‘गाेवंश’ वर्ष आहे. दर बारा वर्षांनी तेथे गाेवंश वर्ष असते. यातून एकच बाब लक्षात येते की, गाेविज्ञानाची व्याप्ती हळूहळू सर्वत्र पसरते आहे.