हाॅस्पिटलमधील ऑक्सिजनच्या टंचाईची स्थिती म्हणजे काय असते, याचा अनुभव गेल्या एप्रिलमध्ये भारताने घेतला आहे.
(भाग : 1455)
हा अनुभव जगातील बहुधा प्रत्येक देशाने गेल्या दीड वर्षात केव्हाना केव्हा तरी घेतला आहे. एप्रिलमधील ऑक्सिजनच्या आणीबाणीच्या काळात रस्त्यावर फक्त अॅम्ब्युलन्सची ये-जा हाेती. तशी अवस्था टाळण्यासाठी त्याच्या आधीच्या स्थितीची काळजी घेणे म्हणे इम्युनिटी वाढविणे.इम्युनिटी वाढविण्यासाठी याेगासनप्राणायाम यांच्यासारखा दुसरा मार्ग नाही.जागतिक याेगदिन हा दि. 21 जून राेजी असताे. यामध्ये अजून एका बाबीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ताे म्हणजे ‘निरामय जीवन पद्धती’ याेगाभ्यास आणि प्राणायाम यापेक्षा ही थाेडी निराळी आहे.आपण या पूर्वी अष्टांग याेग हा शब्द ऐकला आहे आणि षड्चक्र दर्शन हाही शब्द ऐकला आहे. वास्तविक हे दाेन्ही शब्द आध्यात्मिक आहेत. याेग आणि प्राणायाम हे शब्द आध्यात्मिक आहेत.पण, शंभर वर्षांपूर्वी स्वामी कुवलयानंद यांनी याेगासने, प्राणायाम, निरनिराळे बंध, मुद्रा, क्रिया, नाडीशुद्धी, शरीरशुद्धी, षड्चक्रदर्शन यांचा उपयाेग करुन प्रकृती सुधारण्यासाठी एक माेठी अभ्याससंस्था उभी केली.
ती संस्था म्हणजे लाेणावळा येथील ‘याेगविद्याधाम’.वरील सर्व प्रक्रियांचा उपयाेग किती झाला हे यंत्रांच्या साहाय्याने दाखवता आले पाहिजे. वरील सर्व प्रक्रिया या आध्यात्मिकच आहेत; पण त्या आध्यात्मिक आहेत, म्हणून त्याचा वापर हाेत नसे. पण, त्या प्रक्रियांचा प्रकृती सुधारण्याचा अनुकूल परिणाम हाेणे ही त्याची पहिली कसाेटी असली पाहिजे, हे त्यांनी प्रयाेगांनी दाखवून दिले. त्या संस्थेला लाेणावळा येथे काम सुरू करून शंभर वर्षे झाली. सध्या तेथे वरील सर्व बाबींचे प्रशिक्षण सुरू आहेच; पण भारतातील आणि जगातीलही अनेक शहरात त्यांच्या प्रशिक्षण शाखा आहेत. गेल्या पन्नास वर्षात महेश याेगी, याेगाचार्य अय्यंगार, हरे कृष्ण पंथ अशा प्रमुख संस्था आणि हजाराे छाेट्या संस्था जगभर काम करत आहेत. पण, त्यातून भारतीयांनी उपयाेग करून घेतला नाही, तर ते याेग्य हाेणार नाही. स्वामी रामदेव बाबा यांनी गेल्या पंचवीस वर्षांत केलेल्या याेगाभ्यास प्रचाराला तर सीमा नाही. त्यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयाेग करून घेतला.प्रथम त्यांचे कार्यक्रम ‘आस्था’ चॅनेलवर सुरू झाले आणि हळूहळू जगातील शंभरपेक्षा अधिक चॅनेलवर सुरू झाले.