ही बाब झाली औषध संशाेधनाची.त्याच बराेबरही गेल्या तीन महिन्यांत काेराेनाचा जाे रुद्रावतार आपण पाहिला आहे. त्यानुसार पुढील फेज थ्री किंवा अजूनही त्यापुढील समस्यांसाठी प्रत्येकाने स्वत:ची प्रतिकार क्षमता वाढवणे गरजेचे आहे.
(भाग : 1454)
सध्या जाे काेराेना आहे, त्यामध्ये ताेंडावर मास्क, वारंवार हात धुणे आणि दाेन व्यक्तीत सहा फुट अंतर हे निकष आहेत, ते किती पाळले जातात आणि पाळले जात नाहीत, हा स्वतंत्र भाग आहे; पण एक गाेष्ट मात्र पुढे येत आहे की, काेराेनाच आपले स्वरूप बदलण्याची शक्यता आहे, तसे झाले ताे ‘एअर बाॅर्न’ झाला, तर हे तीन निकष कदाचित बदलावे लागतील. जे नवे निकष येतील ते अधिक कडक असतील आणि असणे साहजिकच आहे. यातील महत्त्वाची कसाेटी म्हणजे इम्युनिटी वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धती आणि पारंपरिक औषधे यांचा अवलंब करावा.पारंपरिक पद्धती म्हणजे याेगाभ्यास.काेराेनामध्ये सर्वांत महत्त्वाची कसाेटी म्हणजे आपली ऑक्सिजन लेव्हल ही पंचाण्णव ती शंभर राहिली पाहिजे.त्यासाठी सर्वांत साेपा उपाय म्हणजे याेगाभ्यास. दीड वर्षापूर्वी जेव्हा काेराेना आला तेव्हा आपल्याला आपली प्रतिकारक्षमता किती वाढविली पाहिजे, त्याची कल्पना नव्हती.
पण, गेल्या अठरा महिन्यांत आणि त्यातूनही एप्रिल महिन्यात ऑक्सिजन आणि रेस्पिरेटर यांच्यासाठी जी धावपळ करावी लागली, ती पाहून आपली ऑक्सिजन पातळी व्यवस्थितच असली पाहिजे, याची आपली खात्री पटली. आपण प्रसारमाध्यमात त्याचे जे स्वरूप पाहिले, त्यानुसार विमानातून माेठमाेठे टँकर येत आहेत.देशातील उत्पादन वाढत आहे. नव्या कारखान्यांची घाेषणा हाेत आहे. कदाचित आगामी काळात या ऑक्सिजनचा अजून काही उपयाेग करावा लागेल, एवढे उत्पादन हाेऊ घातले आहे. शहरी भागात आठ महिने प्रचंड प्रदूषण असते. अशा ठिकाणी त्या ऑक्सिजनचा उपयाेग हाेऊ शकेल. पण, शरीरातील प्राणवायू वाढविण्याची उत्कृष्ट पद्धती म्हणजे पहाटे माेकळ्या हवेत िफरणे आणि याेगासने करणे. काेराेनाचा पुढील स्ट्रेन केव्हा येईल त्याची तारीख आज माहीत नाही; पण ताेपर्यंत आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी उत्कृष्ट करून ठेवणे हे आपल्या हातात आहे.त्यासाठी जर याेगाभ्यास पद्धती हाताळली, तर त्या ऑक्सिजन पातळीबराेबरच आपले पचन, हृदयाची स्थिती, फुफ्फफुसाची क्षमता, मानसिक स्थिती आणि कामाची क्षमता या प्रत्येकात चांगली वाढ झालेली असेल.