काेराेनाच्या येणाऱ्या समस्यांवरही विचार करावा

    24-Jul-2021   
Total Views |
 
 
बन्सी गाेशाळेने त्यांच्या आयुर्वेद विभागार्माफत काेराेनाच्या शक्यतांसंदर्भात प्रतिकार क्षमता वाढविणे, निरनिराळ्या स्टेनचे जे रुग्ण पुढे येत आहेत, त्यावर प्रत्यक्ष उपचार आणि काेराेना बरा झाल्यावर प्रकृती पूर्णपणे नीट हाेईपर्यंतचे उपचार यावर स्वतंत्र तीन किट काढले आहेत.(भाग : 1452)
 

corona_1  H x W 
 
अहमदाबादच्या बन्सी गीर गाेशाळेचे गाेपाळभाई सुतारिया यांनी हे संशाेधन कसे असावे, याचाच एक आदर्श नमुना आहे.त्यांचा संपर्क क्र. 06351978087 असा आहे. त्यांचे काम कदाचित गाेविज्ञानातील स्वतंत्र इतिहास बनण्याची शक्यता आहे.जगातील एकूण जी माहिती पुढे आली आहे, त्याच्या आधारे चीनमधील पंच्याऐंशी टक्के रुग्णांवर त्यांनी पारंपरिक वैद्यकाच्या मदतीने उपचार केले आहेत आणि त्यांना यशही मिळाले आहे. अर्थात चीनमधील वनस्पतीवैद्यक हे आयुर्वेदावर आधारित आहे. यात काेणत्या देशातील पारंपरिक वैद्यकशास्त्र कसे आहे, यावर येणाऱ्या काळात चर्चा हाेणार आहे आणि ते आवश्यकही आहे. पण, सध्याचा यातील ऐरणीवरील मुद्दा असा आहे की, सध्या जगात अ‍ॅलाेपॅथी हे अधिकृत वैद्यक मानले जात आहे. त्याच्या लसी निर्माण व्हायला एक वर्ष लागते. काेराेनावरील औषधाबाबत प्रयाेग करायलाही फार वेळ लागला. बरेचसे प्रयाेग ट्रायल अँड एरर पद्धतीचे हाेते.
 
त्यातील समस्या म्हणून ठरलेले मुद्दे म्हणजे त्या पद्धतीने राेगी बरा झाल्यावर दाेन-तीन महिन्यांनी त्याला जर आधीच्या कॅन्सर, किडनीविकार, मधुमेह, हृदयविकार यांचे त्रास असतील, तर ते बळावतात व त्यातच ताे रुग्ण जाण्याची शक्यता माेठी असते. यावर नियंत्रण आणण्यात भारतीय वैद्यकाने यश मिळवले आहे. एवढेच नव्हे, तर येणारे त्याचे जे नवे स्टेन्स किंवा प्रकार पुढे येत आहेत, त्याबाबतही त्यांची तयारी आहे.त्यांच्या औषधांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आयुर्वेदाच्या औषधी वनस्पतींची क्षमता गाेमूत्रांच्या आधारे अनेकपटींनी वाढविली आहे. आयुर्वेदीय औषधी द्रव्यांना गाेमूत्राची भावना देणे याला त्या परिभाषेत मर्दनम् गुणवर्धनम् असे म्हटले जाते. त्या प्रक्रियेला त्यांनी प्राधान्य दिले आहे.यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गाेपाळभाई सुतारिया हे मूळचे हिऱ्याचे व्यापारी. मुंबईतील सालाना आठशे काेटी रुपयांचा हिऱ्याचा व्यापार बाजूला ठेवून त्यांनी गाेसेवेला वाहून घेतले आहे. त्यातून आज वैद्यक आणि कृषिविकास यांना उपयाेगी पडेल, असे विद्यापीठ दर्जाचे काम झाले आहे.त्यांना अनेक विद्यापीठांनी मान्यताही दिली आहे.