सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जगाच्या विज्ञान तंत्रज्ञानापर्यंत किंवा अगदी समुद्रीवाहतुकीपर्यंत काेणतेही क्षेत्र घेतले, तरी त्यात काेराेना महामारीचा संदर्भ येताेच. कारण गेले अठरा-एकाेणीस महिने त्याने साऱ्या जगाला वेठीस धरले आहे.
(भाग : 1451)
ही साथ सुरू झाल्यावर दीड वर्षाने जगात माेठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली की, काेराेना राेगाची साथ हा प्रकार काय आहे? ताे चीनने विषाणू अस्त्र म्हणून निर्माण केला आहे की, वाटवाघळाच्या मांसापासून तयार झाला आहे, या मुख्य शंका आहेत. त्यातील दुर्दैवाची स्थिती अशी आहे की, त्या शाेधासाठी चीन हा देश पुरेसे सहकार्य करताना दिसत नाही. पण, ताे विषाणू निसर्गनिर्मित आहे की विज्ञाननिर्मित, याचा अंदाज शास्त्रज्ञ घेऊ शकतात. त्यानुसार हा विषाणू प्राणीनिर्मित नाही, यावर जगातील बहुतेक शास्त्रज्ञांचे एकमत आहे, तरीही ताे विषाणू अस्त्र म्हणून निर्माण केला, यावर शिक्कामाेर्तब झालेले नाही. सध्या जगाच्या पुढे असलेली सर्वांत माेठी समस्या म्हणजे या महामारीपासून मुक्ती कशी मिळवायची? काेराेनाच्या उगमाबाबत चर्चा कितीही वाढली, तरी अजून त्यावर निर्णायक औषध काय आणि त्यात वारंवार हाेणाऱ्या बदलांवर औषध काय, या समस्येतून जग बाहेर आलेले नाही. चीनने पारंपरिक औषधपद्धतीने त्यावर नियंत्रण मिळवले, याबाबतच्या बातम्या येत आहेत.
भारतात आयुर्वेदतज्ज्ञांनी यावर माेठे यश मिळवले, पण, भारतात अजूनही अॅलाेपॅथी हेच राष्ट्रीय वैद्यक असल्याने राष्ट्रीय औषध प्रणालीकडे अजून म्हणावे असे लक्ष गेलेले नाही. आयुर्वेद प्रणालीबराेबर गाेवैद्यक प्रणालीच्या आधारे जे प्रयाेग झाले आहेत ते अजून पुढे आलेले नाहीत.त्यांचीही संख्या माेठी आहे. यामध्ये अहमदाबादच्या बन्सी गीर गाेशाळेने जे प्रयाेग केले आहेत, ते वैद्यकशास्त्रात नवा इतिहास निर्माण करणारे आहेत.तीनशे गीर गाईंच्या गाेमूत्राचे स्वतंत्र विश्लेषण करून त्यांनी प्रभावी औषधप्रक्रिया निर्माण केली. तीनशे गाईंच्या गाेमूत्रात मानवी जीवनास उपयाेगी असे पाच हजार घटक मिळाले आहेत.गाईंच्या शेणातून तीनशे घटक मिळाले आहेत. गाेमूत्राचे पाच हजार घटक आणि शेणाचे तीनशे घटक यातील प्रत्येक घटक स्वतंत्रपणे महत्त्वाचा ठरणार आहे. त्यातील एका गाेमूत्रातून मिळालेल्या एका घटकातून आज आठ राज्यांत शेतीचे यशस्वी प्रयाेग सुरू झाले आहेत. काेराेनाच्या स्वरूपात यापुढे कितीही बदल झाले, तरी त्यावर निर्णायक असे औषध ठरेल, असे घटकही त्यांना मिळाले आहेत.