पुढची पिढी आयुष्यभर निराेगी राहण्यासाठी गाेविज्ञान

    22-Jul-2021   
Total Views |
 
 
जन्मणाऱ्या बाळाची आई जेव्हा गर्भवतीस्थितीत असते, तेव्हा जर आईला देशी गाईचे दूध पिण्यास दिले, तर जन्मास येणारी पुढची पिढी ही निराेगी तर जन्मेलच, त्याचबराेबर ती बुद्धिमानही असेल, याबाबत भारतीय किसान संघाचे प्रांत संघटनमंत्री दादा लाड यांनी समाजामध्ये अनेक प्रयाेग केलेले आहेत. (भाग : 1450)
 
 
cow_1  H x W: 0
 
त्या सर्व ठिकाणी चांगला परिणाम दिसून आला. एक काळ असा हाेता की, शहरी भागात देशी गाईचे दूध मिळणे अशक्यच असे. ग्रामीण भागात देशी गाई असत, पण त्या दुभत्या असत, असे मात्र नाही. आता देशी गाईंची संख्या ग्रामीण भागासह शहरी भागातही वाढू लागली आहे. त्यामुळे देशी गाईचे दूध उपलब्ध करणे प्रयत्नाने शक्य आहे.सध्या अन्नखर्चापेक्षा औषधांचा खर्च माेठा झाला आहे. याचे कारण आपण जे अन्न खाताे ते रासायनिक खतांच्या शेतीवर वाढविल्यामुळे त्यात विषांश असताे. महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे माेठ्या प्रमाणावर रासायनिक खते वापरली जातात. त्यामुळे पन्नास वर्षांत अन्नातील विषांश वाढला आहे. दादा लाड यांच्या म्हणण्यानुसार, हा विषांश आपण घेत असलेल्या अन्नाच्या पंधरा टक्के एवढा वाढला आहे. त्यामुळे जी व्यक्ती त्याच्या प्रयत्नाने म्हणजे याेगाभ्यास, जिम करून निराेगी जीवन जगते, त्यांनाही काही ना काही औषध घ्यावेच लागते. लाेकांमधील शुगरपासून ते कॅन्सरपर्यंतचे त्रास वाढले आहेत.
 
पंचवीस तीस वर्षांपूवी एखाद्या खेड्यात किंवा शहरातील वसाहतीत एखादा रुग्ण कॅन्सरग्रस्त असायचा. आता मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंड, हृदयविकार, मानसिक तणाव हे आजार अनेक ठिकाणी वाढले आहेत. काेल्हापूर जिल्ह्यातील शिराळा या तालुक्यात कॅन्सरचे पंधरा हजार रुग्ण असल्याचा अहवाल पाच वर्षांपूर्वी एका संस्थेच्या पाहणीतून पुढे आला हाेता.अन्य तालुक्यांतील, जिल्ह्यांतील आणि राज्यातील स्थिती ही झाकली मूठ आहे.गाेविज्ञान, याेगाभ्यास, निरामय जीवनाच्या भारतीय पद्धती, अध्यात्मिक उपासना यांच्या आधारे आपले जीवन कसे निराेगी ठेवायचे, हा व्यापक विषय आहे. पण ज्यांच्याकडे सध्या गृहिणी, लेकी, सुना या गर्भवती स्थितीत असतील त्यांनी कटाक्षाने देशी गाईचे दूध प्राशन करावे. त्यामुळे त्यांची पुढची पिढी ही निराेगी हाेईल आणि प्रामुख्याने बुद्धिमान हाेईल. गेल्या काही वर्षांत मेडिकल सायन्सचा विकास झाला आहे. म्हणजे प्रत्येक छाेट्या व्याधीचे स्पेशालिस्ट उपलब्ध झाले आहेत. देशी गाईचे दूध त्यांच्या मातेने प्राशन केल्यास आयुष्यात काेणत्याही स्पेशालिस्टकडे जाण्याचा प्रसंग येणार नाही.