तानाजी निकम यांच्या प्रयाेगास काेविड काळात अधिक महत्त्व

    20-Jul-2021   
Total Views |
 
तानाजी निकम यांच्या प्रयाेगावर आपण काेविडच्या काळात चर्चा करत आहाेत. या काळात रासायनिक खतांचा वापरही धाेकादायक ठरू शकताे; पण गाेआधारित शेतीबाबत ताे मुद्दा येत नाही. (भाग : 1448)
 

cow_1  H x W: 0 
 
ऊस, तूर, गहू, हरभरा अशी उत्पादने त्यांनी घेतली तेव्हा त्यांनी जीवामृत, अमृतपाणी, गाेबरस्लरी आणि अखाद्य पेंड यांचा वापर केला. अखाद्य पेंड म्हणजे करंज्याच्या बियांची पेंड. ती पेंड जनावरेही खात नाहीत; पण खत म्हणून ती अप्रतिम असते. दर आठवड्याला वरील संजीवकांचा व्यवस्थित वापर झाला, तर त्यांची वाढ सशक्त हाेते. त्याच बराेबर त्यांनी सुचवलेले उपाय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने जाणकार व्यक्तीकडून पिकाचे नियाेजन समजून घ्यावे.सुयाेग्य वेळ आणि सुयाेग्य पद्धती हाच त्याचा मार्ग आहे. शेतातील पेरणी दक्षिणाेत्तर असावी. गिरिपुष्पांचा हिरवळीचे खत म्हणून वापर, त्याच प्रमाणे सरकी पेंड, शेंगदाण्याची टाकाऊ पेंड याकडे लक्ष ठेवावे. मिश्रपीक पद्धतीत देशी बियाणांचा वापर केल्यास चांगला प्रतिसाद मिळताे.
 
तानाजी निकम यांच्या प्रयाेगास आता अधिक महत्त्व आले आहे. कारण आजपर्यंत आपल्या आजूबाजूला फक्त विषयुक्त खते, विषयुक्त कीटकनाशके, विषयुक्त बियाणे असत. त्यावर आलेले अन्न खाल्ले की, काेणती ना काेणती व्याधी ही आलीच असे समजा, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. ती औषधे म्हणजे अजून विष. आता तर काेराेनामुळे वातावरणही विषाणुयुक्त झाले आहे.
काेराेनाचा काळ हा किती दिवस आहे हे सांगणे कठीण आहे; पण जाणकारांचे म्हणणे असे की, ताे किमान तीन ते चार वर्षे असणार आहे. कदाचित व्हॅक्सिनमुळे आपण त्यातून मार्गही काढू. त्यातील धास्ती कमी झाली असे हाेणार नाही. एका एकराच्या बागाईती शेतीला पंचवीस ते तीस हजार रुपयांची रासायनिक खते हा विषांश निर्माण करणारा उपाय आहे.
 
त्याचप्रमाणे घरात देशी गाेवंश पाळून अतिशय कमी खर्चात गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डपर्यंत पाेहाेचणे हाही अधिक परिणामकारक मार्ग असू शकताे. त्याचप्रमाणे काेराेनावर विदेशी औषधे हा कदाचित अपरिहार्य इलाज आहे, तर त्याचप्रमाणे आयुर्वेद इलाज आणि याेगाभ्यास हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.काेराेनावरील तातडीची उपाययाेजना म्हणून आज आपण व्हॅक्सिन किंवा अन्य अ‍ॅलाेपॅथिक औषधे घेणार असू आणि तरीही पुढील स्ट्रेन येण्याची शक्यता असेल, तर ताेपर्यंत आपण आपली प्रकृती याेगाभ्यासाने सामना करण्यापर्यंत तयार ठेवली पाहिजे. त्यात गाेविज्ञान आपल्याला माेठे सहकार्य करण्याची शक्यता आहे.