चीन हा सध्या अर्थव्यवस्थेत ‘लंबे दाैड का घाेडा’ झाला आहे, असे मानले तर आपल्या देशालाही शेराला सव्वाशेर असे ‘लंबे दाैड का घाेडा’ व्हावे लागेल.(भाग : 1430)
‘युद्ध’ हा शब्द असा आहे की, त्याच्या उल्लेखानेही अंगावर शहारे येतात.पण, ताे प्रसंग अंगावर पडला की, साधी साधी माणसेही त्यातून मार्ग काढतात.गेल्या काही दिवसांत जगभरातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्याचा विचार करता विषाणू महामारीचे हे संकट जगातील कांही देश ‘तिसरे महायद्ध’ या परिमाणाने घेत आहेत. चीननेही शेजारी देशांशी वेळप्रसंगी लढण्यासाठी माेर्चेबंदी केली आहे.पाकिस्तानचे सैन्य साहजिकच आजपर्यंंत त्यांची सीमा सांभाळत हाेते. तेथे आता चीन सेनेने माेर्चेबांधणीत सहभाग घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण ‘आपापल्या पातळीवर कमांडाे’ असण्याची गरज आहे.त्याची सुरुवात बारा सूर्य नमस्काराने किंवा एक नमस्काराने करता येते. पाठाेपाठ एक एक तासाचा याेगाभ्यास आणि षट्चक्रभेदन असे अभ्यास सुरू केले, तर त्याचा स्वत: कमांडाे हाेण्यास उपयाेग हाेईल.
चीन हा सध्या अर्थव्यवस्थेत ‘लंबे दाैड का घाेडा’ झाला आहे, असे मानले तर आपल्या देशालाही शेराला सव्वाशेर असे ‘लंबे दाैड का घाेडा’ व्हावे लागेल. साठ वर्षांपूर्वी चीनने चीनच्या वृत्तीचा परिचय आपल्याला दिला; पण आपण आपला परिचय देऊ शकलाे नाही. आपल्या देशाने तीन वर्षांपूर्वी ताे परिचय दिला आहे; पण ताे पुरेसा नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती जर कमांडाे तयारीची असेल तरच ताे देश कमांडाे असताे. शेतीवर ‘गाे-आधारित आधारे नाममात्र खर्च करून इस्राईलसारखे उत्पादन, आपली काैटुंबिक स्थिती, स्कूटर, माेटार चालवण्याची असली तरी दरराेज दहा किमी चालण्याची सवय, घरात खाण्यापिण्याची सुबत्ता असली तरी संकटकालीन आहाराची सवय ही त्याची लक्षणे आहेत.
वास्तविक हे विषय गेल्या दीड वर्षात अनेकांना स्वीकारावे लागले आहेत. पण, आता तर त्यांची प्रयत्नपूर्वक सवय करून ठेवावी लागेल. प्रथमदर्शनी याचा त्रास वाटणे सहाजिक आहे; पण लांब पल्ल्याचा विचार करता त्याचा उपयाेगच अधिक आहे.गेल्या शतकातील दाेन महायुद्धे प्रत्यक्षत: चार चार वर्षेच चालली. पण त्याचे परिणाम नंतर आठ दहा वर्षे चालले.त्या महायुद्धात अनेक देशांनी एक एक वेळ फक्त बटाटे उकडून किंवा ब्रेडच्या दाेन दाेन स्लाईसवर दिवस काढले. या पार्श्वभूमीवर काेराेना महामारी ही महायुद्ध असेल तरी आणि नसेल तरी वरील तयारी आवश्यक आहे. हे महायुद्ध नसेल तरी काेराेना फेजेसचा आकडा माेठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.