शेतीच्या चांगल्या सवयी गिनीज बुकपर्यंत नेतात

    19-Jul-2021   
Total Views |
 
 
एक गव्हाच्या ओंबीत 140 दाणे.पाच फुटापर्यंत येणारी झाडप्रजाती.एकरी सदतीस क्विंटल उत्पादन.त्याचप्रमाणे एका झाडाला अडीच हजार म्हणजे 2500 घाटे येणारा हरभरा. (भाग : 1447)
 

wheat_1  H x W: 
 
देशी माेहरी, भाेपळ्याएवढा नारळ, देशी पपई, देशी करवंदे, देशी पेरू.यातील महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या शेती उत्पादनाची बियाणे स्वत: तयार केली हाेती. तानाजी निकम यांचे म्हणणे असे की, चांगली शेती करण्यासाठीफार माेठा खर्च करावा लागताे, ही कल्पना साेडून दिली पाहिजे. पण चांगली शेती करण्यासाठी ज्या सवयी अंगी बाणाव्या लागतात, त्या मात्र लाेकांनी साेडून दिल्या आहेत.
अलीकडे काळ असा आला आहे की, गेल्या पन्नास वर्षात लागलेल्या रासायनिक खतांच्या आधारे शेती बाबतीत अनेक सवयी अंगवळणी पडल्या आहेत.उभ्या पिकाबाबत काहीही समस्या आली की, प्रथम रासायनिक खते, विदेशी बियाणे, कीड मारणारी रसायने यांची नावे आपली ताेंडपाठ झाली आहेत.
 
आपल्याला फक्त सेंद्रिय शेती करायची नसून ती विषमुक्त शेती करायची हे गृहीत धरले की, एक एक मुद्दा सुचायला लागताे. याला छेद देणारी एक घटना आपल्या बाजूबाजूला घडत असते, त्यापासून सावध राहावे लागते.ती म्हणजे रासायनिक खते, पेस्टिसाईड, विदेशी बियाणे या बाबी एका मिनिटाच्या अंतरावरील दुकानात मिळतात. त्यामानाने गाेमूत्र, शेण यांच्यात हात घालणे घाण वाटू लागते. त्या साऱ्या बाबी जुन्या हाेऊन पन्नासपेक्षाफार अधिक वर्षे झालेली नाहीत तरीही त्या जुन्या बाबी जुनाट वाटू लागल्या आहेत. तानाजी निकम यांचे म्हणणे असे की, पिकांचा सांभाळ हा मुलाप्रमाणे करायचा आहे, असे ठरविले की, पुढील सारे बदल आपाेआप हाेतात. त्यासाठी जीवामृत, अमृतपाणी, गाेबरस्लरी हे शब्द आपले परवलीचे शब्द असले पाहिजेत.
 
अशा शेतीत गाेआधारित पद्धतीने जेवढे मन घालावे, तेवढे ते विषय ‘निगीज बुक’कडे जाण्याची शक्यता वाढते.अशा प्रत्येक प्रयाेगाला काही गिनिज बुकमध्ये नाेंद मिळत नसते. पण गाेआधारित संसाधने वापरलेली जमीन ही आपली आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, बहीण यापैकी वाटू लागते. ज्यांनी जैविक शेती केली आहे, त्यांनी त्या शेतातील माहिती पाच दहा मिनिटे हातात घेऊन बघावे.
मातीला मन असते का, हे शाेधायला माेठमाेठ्या संशाेधकांकडे जावे लागेल पण ज्याला काळी आई म्हणतात, अशा ठिकाणी केवळ उभे राहण्यातूनही जिव्हाळ्याचा अनुभव येताे. माेरेश्वर जाेशी, 9881717855