गाेआधारित पद्धतीने शेताला कमी पाणी लागते, हे तर आपण प्रत्यक्ष बघताेच पण त्याचे नेमके माेजमाप, पिकात किंवा धान्यात राेगप्रतिकारक क्षमता येते, याचे माेजमाप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातच त्याला सकारात्क प्रतिसाद मिळत आहे.
(भाग : 1445)
एकेकाळी गाय आणि बैल हा शेतीचा मध्यवर्ती घटक हाेते. ते आजही ते अनेक ठिकाणी आहेत पण ते तेथे आज गरिबीचे प्रतीक आहेत. ट्रॅक्टरचा वापर हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. याचे महत्वाचे कारण गाय किंवा बैल यांचे शेतीतील मध्यवर्ती महत्वच विसरले गेले. गाेवंश आणि शेती यांचा एक संवाद असताे, याकडेच दुर्लक्ष झाले.शेतीत बैल औताला जाेडणे किंवा कधी तरी शेतातील वैरण घरच्या बैलगाडीने घरी आणणे, येवढ्यापुरता हा उपयाेग मर्यादित नाही. एक बैल शेतीचे किंवा बैलगाडीचे काम करताे, त्यात त्याचा खर्च तर निघताेच; पण घरात देशी बैलाचे शेण आणि गाेमूत्र मिळते. एक बैल एका दिवसात पंधरा किलाे शेण देताे. त्यातील दहा किलाे शेणातच साध्या शेतीचे एक वर्षाचे अमृतपाणी किंवा जीवामृत असे घटक तयार करता येतात. उसासारख्या शेतीला दर महिन्याला जरी अमृतपाण्याचा हप्ता दिला तरी एका बैलाच्या आधारे तीस ते चाळीस एकर उसाची शेती हाेत असते. त्यातील अजून एक महत्वाचा भाग म्हणजे ताे बैल अजून औताला जुंपण्याएवढा माेठा झालेला नसेल किंवा कदाचित म्हातारा झाल्याने त्यांच्याच्याने काम हाेत नसेल तरीही त्याचा उपयाेग फार माेठा आहे.
या विषयावरील गाेशाळासंबंधित संस्थांची निरीक्षणेसकारात्मक आहेत.पण हा विषय जर देशात आणि जगात विद्यापीठीय पातळीवर मांडला जाण्याची गरज असेल तर या सगळ्याचे ‘शास्त्रीय प्रयाेग’ पातळीवर काम झाले पाहिजे.सध्या बिहार कृषि विद्यापीठात ते सुरू आहे.गेल्या पन्नास वर्षांत देशात ‘हायब्रिड बियाणांचे’ अनेक प्रयाेग केले गेले. धान्य टंचाईच्या काळात कमी वेळेत अधिक उत्पादन असे त्याचे आकर्षण हाेते.पण बिहार कृषि विद्यापीठाचे कुलपती डाॅ विनाेदकुमार यांनी सांगितले की, हायब्रिडचा प्रयाेग त्यांनी पूर्णपणे बंद केला आहे आणि तरीही गाे आधारित आधारे देशी बियाणात चांगले पीक येत आहे. औताला बांधायच्या बैलाच्या आधारे अमृतपाणी, जीवामृत तयार करून अधिक उत्पादन घेण्यास आरंभ तर झाला आहे.पण हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाेहाेचलेला नाही. त्यातील दुसरी एक सम स्या अशी आहे की, प्रसारमाध्यमावर सध्या खतांच्या जाहिरातींचा मारा सुरू आहे.त्यातील आकर्षक विधानामुळे ते खरे की गाेआधारित शेती हे खरे असा सहाजिकच प्रश्न पडताे. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:हून अभ्यासासाठी एक पाऊल पुढे आले पाहिजे. बिहार कृषीविद्यापीठाने त्याला ‘भारतीय प्राकृतिक कृषि पद्धती’असे नाव दिले आहे.