हरियाणामधील साेहनायेथे कृषि विज्ञान केंद्र येथे कृषिवैज्ञानिक डाॅ. पी. पी. सिंह यांनी हे प्रयाेग केले तर आहेतच पण ते छाेट्या शेतकऱ्यांकडून तसे प्रयाेग करून घेत आहेत. त्यात त्यांनी एकरी साठ ते पासष्ट क्विंटल धान्य घेतले आहे
(भाग : 1443)
एका गाेवंशाच्या शेणापासून तीस एकरपर्यंत बागाईत शेती हाेते हा पश्चिम महाराष्ट्रात तीस वर्षार्ंपूर्वी सिद्ध झालेला अनुभव आता उत्तर भारतातही स्वीकारला जात आहे.उत्तर प्रदेशातील साेहना येथील वरिष्ठ कृषि वैज्ञानिक डाॅ. पी. पी. सिंह यांनी ‘एका गाेवंशाच्या शेणात आणि गाेमूत्रात तीस एकर शेती हाेते’ या विषयाची प्रात्यक्षिके आणि प्रचार करायला आरंभ केला आहे.महाराष्ट्रात 1985 या वर्षाच्या सुमारास माेहनराव देशपांडे यांनी या अभ्यासाला आरंभ केला. त्यांनी एका गाेवंशाच्या आधारे म्हणजे गाेमूत्र आणि शेण यांच्या आधारे केलेले अमृतपाणी, बीजप्रक्रिया, गाेमूत्रजल सिंचन आणि वडाच्या झाडाखालील माती यांच्या आधारे बागाईत शेतीशी म्हणजे ऊस, द्राक्षे, केळी अशा नगदी उत्पन्नवाल्या शेतीशी स्पर्धा करू शकणारी शेती तयार केली. त्यासाठी त्यांनी श्रीमद्भगवद्गीता, वेदमहर्षी व्यास, त्यांचे वडील ऋषी पराशर, यांच्या विधानाचा आधार घेतला. प्रामुख्याने भगवान पतंजली यांनी माणसाचा स्वभाव निश्चित करणारी काही विधाने केली आहेत. त्या आधारे त्यांनी वनस्पतीच्या स्वभावाचा वेध घेऊन त्याच्या आधारे कृषिपद्धती निर्माण केली.याच काळात राजीव दीक्षीत यांनी केलेले काम माेठे आहे.
तरीही पतंजलीच्या याेगसूत्रानुसार वनस्पतीचा स्वभाव ठरवून त्यानुसार शेती करणे ही फारच अभिनव पद्धती हाेती. त्यावर आज हिंदी, इंग्रजी, मराठी या भाषांमध्ये पुस्तकही उपलब्ध आहेत. पंचवीस वर्षापूर्वी रासायनिक खते घालून शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीत 45 हजारांचे उत्पन्न मिळत असे.त्या काळी ते चांगले मानले जायचे.पण एकरी फक्त पाचशे रुपये खर्चाची गाेआधारित शेती करून त्याने अडीच लाखांचे उत्पन्न मिळवले.अतिशय कमी खर्चात रासायनिक खतांच्या वापरापेक्षाही अधिक उत्पन्न देणारी शेतीची उदाहरणे आता माेठ्या प्रमाणावर मिळू लागली आहेत. पण गेल्या साठ वर्षांत सामान्य शेतकऱ्याला सवय झाली आहे ती रासायनिक खतांची. खते म्हणजे रासायनिक खते आणि त्याला जाेड म्हणजे शेणाचे उकिरडा खत. पण दहा किलाे शेणात एक एकर शेती हाेते, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यातील बारकावे तपासले पाहिजेत. त्याचे छाेटे छाेटे प्रयाेग केले पाहिजेत. हरियाणामधील साेहनायेथे कृषि विज्ञान केंद्र येथे कृषिवैज्ञानिक डाॅ.पी. पी. सिंह यांनी हे प्रयाेग केले तर आहेतच पण ते छाेट्या शेतकऱ्यांकडून तसे प्रयाेग करून घेत आहेत. त्यात त्यांनी एकरी साठ ते पासष्ट क्विंटल धान्य घेतले आहे.