भारतीय पद्धतीचा नीट आहार आणि नीट झाेप यामुळे जी प्रतिकारशक्ती निर्माण हाेते, ती काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा प्रतिकार करू शकते.(भाग : 1442)
काेराेनाच्या पुढील तारखा जाहीर हाेऊ लागल्या आहेत. पहिले दाेन्हीही टप्पे हे अनपेक्षित आले, त्याची तयारी करायला पुरेसा वेळ मिळाला नाही. दिल्ली येथील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डाॅ. रणदीप गुलेरिया यांनी जाहीर केले आहे की, तिसरी लाट बहुदा ऑगस्टमध्ये येईल.सध्या त्यांचे स्थान देशातील या संसर्गजन्य व्याधीबाबत प्रवक्ते असे आहे.गेल्या दीड वर्षांंत केंद्र सरकार, राज्य सरकार, अनेक संस्था, अनेक संशाेधक यांनी संशाेधन व अभ्यास करून अनेक मार्ग पुढे आणले आहेत. त्याचा उपयाेगही हाेत आहे. प्रत्येक व्यक्ती या साऱ्यांशी काेठे ना काेठे संबंधित असणे साहजिक आहे. माेठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू झाले आहे. आयुर्वेदाच्याही अनेक संस्थ आणि अनेक व्यक्ती यांनी केलेल्या प्रयत्नांनाही यश मिळत आहे.
गाेविज्ञानाचे प्रयाेगांनाही माेठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. याबाबत आपण गेल्या दीड वर्षात अनेक विषय दिले आहेत. या साऱ्या विषयांत अजून एका बाबीची जाेड देणे आवश्यक आहे ती म्हणजे केवळ आहार आणि झाेप यांच्या आधारे प्रतिकारशक्ती वाढविणे. भारतीय पद्धतीचा नीट आहार आणि नीट झाेप यामुळे जी प्रतिकारशक्ती निर्माण हाेते, ती काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा प्रतिकार करू शकते. काेराेनासारखे आजार प्रथम प्रतिकार शक्तीवर हल्ला करत असतात.आपण प्रत्येक जण प्रतिकारशक्तीसाठी आणि कांही संसर्ग झाला असल्यास ताे बरा हाेण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करतच आहात. त्याचबराेबर भारतीय पद्धतीचा साधा आहार आणि सहा तास झाेप याकडे लक्ष ठेवावे. त्याचा माेठा उपयाेग हाेईल.
काेराेनाच्या समस्या किती आहेत, या बाबी महत्त्वाच्या आहेतच; पण गेल्या काही वर्षांत आपण दूषित अन्न खाऊन आपली प्रतिकारशक्ती कमी केली आहे.काेराेना येईपर्यंत बाहेरचे इन्स्टंट फुड टाळले पाहिजे.अतितिखट, अतितेलकट हे प्रकार कमी करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिनी जीवनक्रमात हालचाल तर आवश्यक आहेच पण अतिश्रम टाळावेत.माेसमी फळे, पाेळी भाजी, पालेभाज्या, ताक, प्रथिने (प्राेटीन), कर्बाेदके (कार्बाेडायड्रेड), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन) या बाबी महत्त्वाच्या समजाव्या. थंड अन्न प्रतिकारशक्ती घटविते. गरम अन्नाने त्या अन्नातील सारे घटक शरीराला मिळतात.सध्या ताज्या फळभाज्या, ताजी फळे, ताजा स्वयंपाक, शुद्ध हवेत फिरणे, त्याचबराेबर काही वेळ माेकळ्या हवेत फिरणे आवश्यक आहे. ही माहिती वैद्य ज्याेती मुंदर्गी यांनी दिली आहे.