जागतिक ‘दूध दिवस’ हा जागतिक ‘गाय दिवस’ व्हायला हवा

    12-Jul-2021   
Total Views |
 
 

milk_1  H x W:  
 
जगभर दि. 1 जून हा जागतिक दूध दिवस म्हणून पाळला जाताे. त्याची सुरुवात दि. 1 जून 2001पासून झाली. या दिवशी जगात शाळा महाविद्यालयात आणि निरनिराळ्या संस्थांतून दूधविषयक प्रबाेधन कार्यक्रम घेतले जातात. (भाग : 1440) त्याच प्रमाणे जगात अनेक देशात शेतकरी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी या दिवसाचा उपयाेग करतात. गेली वीसही वर्षे या दिवशी एक मागणी जगात प्रामुख्याने केली जाते ती ही की, दुधाला पुरेसा भाव मिळाला पाहिजे.यावर्षीही जगात हीच मागणी केली जात आहे. आग्नेय आशियातील थायलंड, कंबाेडिया, आि्रकेतील बहुदा सारेच देश, भारतासारखा खंडप्राय देश आणि अमेरिकेसारखा महासत्ता देश येथे यावर्षी शेतकऱ्यांना हीच मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. महाराष्ट्रात शासनाच्या वतीने जाे खरेदीचा भाव जाहीर करण्यात आला आहे, ताे भाव दिल्याचे दाखवतात पण प्रत्यक्षात पाच रुपये कमी दिले जातात. काेविडच्या कारणाने अजून तीन रुपये कमी दिले जात आहेत.हा दिवस जागतिक अन्न आणि शेती संघटनेने निवडला म्हणून साजरा हाेत आहे. सध्या क्षेत्रात शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे ही जशी रास्त मागणी आहे, त्याच प्रमाणे ग्राहकांना शुद्ध दूध मिळाले पाहिजे, हीही तेवढीच महत्वाची मागणी आहे.
 
काही अपवाद वगळता शुद्ध दूध मिळणे दुरापास्त झाले आहे. किंबहुना जाणकारांचे म्हणणे असे की, जनावरावरील हाेणाऱ्या खर्चाचा विचार करता शुद्ध दूध विकणेच परवडत नाही. जागतिक स्तरावर दूध दिवस साजरा हाेणे हे कितीही अभिनंदनीय असले तरी खरी गरज आहे ती, दूध देणारी, गाय, म्हैस, शेळी यांच्यासाठीचे दिवस पाळून त्यांच्याकडे लक्ष देण्याची. कारण साऱ्या गरीब देशात दुभती जनावरे आजारी पडली की, शेतकरी आपला आपणच त्या जनावरांना ‘अ‍ॅण्टिबायाेटिक’ औषधे देताे.त्यामुळे जनावर लवकर बरे झाल्यासारखे वाटते पण अ‍ॅण्टिबायाेटिक्स औषधाचा अंश दुधात उतरताे. ताे त्या दुधाचे वापर करणाराच्या शरीरातही जाताे आणि त्यातूनच पुढे नदी नाल्यातही जाताे.रासायनिक खतापेक्षाही हा वापर अधिक धाेक्याचा असताे. या जनावरांना आहार म्हणून दिले जाणारे गवत हेही रासायनिक खतावर वाढलेले असते.त्याचा जेवढा माणसावर परिणाम हाेऊन ते कायम औषधेच घेत असतात, तीच स्थिती जनावरांची हाेत असते. पण त्यांची याेग्य चिकित्सा हाेत नाही. यातील सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे गाय-म्हैस हे फक्त दुधाचे उत्पादन देणारे प्राणी मानून ताे डेअरी व्यवसाय केला जाताे.