गाईच्या शेणाची किंमत किती कमी असू शकते आणि किती अधिक असू शकते, यावर या आठवड्यात अचानक चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हेतर त्याची उदाहरणेही पुढे आली आहेत. (भाग : 1438)
छत्तीसगडमधील काेरबा जिल्ह्यातील धुरेना खेडेगावातून एका शेतकऱ्याचे दाेनशे किलाे शेण चाेरीला गेले.सध्या छत्तीसगडमध्ये शेणाला महत्त्व आले आहे. कारण तेथील राज्य सरकारने दाेन रुपये किलाे या दराने त्याची खरेदी सुरू केली आहे. तेथे सध्या काँंग्रेसचे सरकार आहे आणि स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने बैलजाेडी आणि गााईचे दूध पिणारे वासरू या चिन्हावर मते मिळवली. स्वातंत्र्याच्या निम्म्या काळात हीच चिन्हे असताना 35 पैकी 32 वर्षे त्यांना राज्य मिळाले; पण त्यांनी त्या आघाडीवर प्रयत्न येवढाच केला की, भारत हा जगातील क्रमांक एकचा गाेमांस निर्यात देश बनविला. गाेवंश चिन्ह साेडल्यावर काँग्रेस या देशात कधीही स्थिर राज्य करू शकली नाही. काँग्रेसला केंद्रात सहा वेळा आणि राज्यातूनही वारंवार सत्ता साेडावी लागली. पण, आता देशात भाजपाने भारतीय संविधानात असलेल्या गाेसंरक्षणाला महत्त्व दिल्यावर व त्या दिशेने काही याेजना सुरू केल्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अन्य राज्यांपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारी याेजना आणली. शेणाला महत्त्व आल्यावर शेणाच्या चाेरीलाही महत्त्व आले.
त्याबाबतच्या जेव्हा बातम्या येऊ लागल्या, तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संदीप पात्रा यांचे एक विधान उजेडात आले आहे, ते म्हणजे ‘गाईच्या शेणाला काेहिनूर हिऱ्यापेक्षा अधिक महत्त्व आहे’. त्यावरही टिपणी हाेऊू लागली. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या पाच सहा वर्षात जे माेठ्या प्रमाणावर गाेवैद्यकाचा आणि गाेआधारित शेतीचा वापर सुरू झाला त्यातून कॅन्सर, किडनीविकार या व्याधीवर जेथे एक लाखापासून एक काेटीपर्यंत खर्च येत असे, तेथे गाेविज्ञानाच्या आधारे फक्त एक दाेन हजार रुपयांत उपचार हाेऊ लागले. त्यातीलही महत्त्वाची बाब म्हणजे कॅन्सरमधील समस्येची परिसीमा म्हणजे हाेणाऱ्या वेदना. त्या वेदना तर गाईच्या पंचगव्याच्या आधारे बनविलेल्या औषधाच्या आधारे अगदी एक आठवड्यात आटाेक्यात येतात. त्या व्याधी बऱ्या हाेण्याचे प्रमाण 95 टक्क्यापेक्षा अधिक आहे. गाेविग्यान अनुसंधान केंद्र देवळापार, नागपूर फोन- 07122772273 आहे.त्यांच्यासाठी शेणाचे माेल निश्चितच काेहिनूर हिऱ्यापेक्षा अधिक आहे.शेतकऱ्यांबाबतही हीच स्थिती आहे.त्याच प्रमाणे ऊस, हळद, द्राक्षे अशी नगदी पिकांची शेतीही एकरी फक्त वीस किलाे शेण, तेवढेच गाेमूत्र, वडाखालची माती अशा नाममात्र किंमतीतील वस्तूंद्वारे द्रावण निर्मिती सुरू झाली आहे.