याेगिक अभ्यासही आणि ‘कमांडाे’चा अभ्यासही

    01-Jul-2021   
Total Views |
 
 
अलीकडच्या काळात काेणतीही बाब नव्याने सुचवायची म्हणजे फक्त थाेडा उल्लेख व थाेडी अधिक माहिती येवढ्यावरच थांबावे लागते. कारण त्या त्या विषयाची माहिती विस्तृत असते.
 (भाग : 1429)
 

yoga_1  H x W:  
त्याचा जर वापर करायचा असेल तर त्याच्या साऱ्या कृती, करावयाच्या बाबी, टाळावयाच्या बाबी, शेकडाे उदाहरणे, अनेकांचे अनुभव, त्या बाबी करताना कांही चुका झाल्याने फसलेली उदाहरणेही द्यावी लागतात. म्हणजे त्या चुका हाेऊ नयेत, अशी खबरदारी घेता येते.या साऱ्यांची माहिती तर लागतेच; पण शक्य असेल तर ‘यू-ट्यूब’ व्हीडीओही लागतात. नव्या तंत्रज्ञानाने ते सारे शक्य असते. वरील परिच्छेदात गाेपालजी सुतरिया यांच्या गाेविज्ञान शेतीचा उल्लेख आहे.त्यावर शेकडाे व्हिडीओ उपलब्ध आहेत.त्यात शंकासमाधानाचीही साेय उपलब्ध आहे. अजून एखादे उदाहरण द्यायचे तर चांगल्या प्रकृतीसाठी ‘षट्चक्रभेदन’ हा उपाय. वास्तविक याेगाभ्यास, प्राणायाम, अष्टांगयाेग, षट्चक्रभेदन हे समाधीसाधानाचे मार्ग आहेत.
 
त्यासाठीही ते करावेत. पण, परदेशातून कळत न कळत विषाणूंच्या साथी किंवा विषाणूंच्या माध्यमातून महायुद्ध हाेण्याची शक्यता असेल, तर प्रत्येकाने स्वत:ला या सर्वांविराेधात लढण्यास आणि स्वत:चे संरक्षण करण्यास आवश्यक ती ‘कमांडा’ प्रशिक्षणाची तयारी केली पाहिजे व ती सतत अधिकाधिक विकसित म्हणजे ‘व्हॅल्यू अ‍ॅडेड’ केली पाहिजे. यावेळी आपण फक्त गाेआधारित शेती, गाेवैद्यक आणि येणाऱ्या संकटाच्या वाढीबाबत बाेलली जाणारी शक्यता लक्षात घेऊन स्वत:ला कायम तयार ठेवण्याबाबतच विचार करत आहाेत.
 
गाैविज्ञानाची माहिती देताना त्यातील सारे प्रयाेग देणे किंवा षट्चक्रभेदनावर सविस्तर माहिती देणे, हे केले तर आपले मूळ विषय बाजूला राहतील म्हणून ते व्यापकपणे काेठे बघायला आणि अभ्यास करायला मिळतील, याची माहिती देणे येवढेच करणे शक्य असते.अलीकडे मुद्रित माध्यमात किंवा समाजमाध्यमात ही पद्धती यशस्वीही ठरली आहे आणि प्रभावीही ठरली आहे. यामध्ये प्रत्येकाला याेगाभ्यास मार्गदर्शन किंवा षट्चक्रभेदन यांचे मार्गदर्शन मिळेलच असे नाही. अशा लाेकांनी फक्त बारा सूर्य नमस्कारांनी आरंभ करावा. याचे महत्त्व आज लक्षात येणार नाही. पण, ज्यांना काेविड झाला, त्यात हाॅस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले किंवा घरातील विलगीकरणावर निभावले, त्यांचे जर त्यापूर्वी एक वर्ष फक्त बारा सूर्यनमस्कार असते, तर काेविडच्या संसर्गाचा त्यांच्यावर परिणाम झाला नसण्याची शक्यता माेठी हाेती. पण, अजून वेळ गेलेली नाही.