न्यूझीलंडमधील ‘झीराे’ कंपनीचे व्यापक उपक्रम

    09-Jun-2021   
Total Views |
 
दूध या क्षेत्रात भारतीय गाेवंशाचीफार वैशिष्ट्ये आहेत. पण ती जगात जाऊन सिद्ध करावी लागतील. त्या दृष्टीने याेग्य प्रयत्न झाला, तर भारत हा न्यूझीलंडच्याफार पुढे जाईल.
(भाग : 1406)
 

zero_1  H x W:  
 
वीस वर्षांच्या मुलांनीही महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेऊन कामाला लागावे, असा जाे न्यूझीलंडमध्ये प्रयाेग सुरू आहे, त्याचे भारताच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे. पहिले कारण म्हणजे न्यूझीलंड ही जगातील गाेवंश क्षेत्रातील सर्वात माेठी प्रयाेग भूमी आहे.अनेक अर्थांनी तेथील परिस्थितीशी भारताशी तुलना हाेते आणि अनेक बाबतीत ती तुलना हाेणे शक्यही नाही.तुलना करायला याेग्य क्षेत्र म्हणजे गाईचे दूध, यावर जगात संशाेधन करणारे जे आघाडीचे देश आहेत, त्यात न्यूझीलंडचा समावेश हाेताे. भारतीय गाेवंशाचे दूध अनेक अर्थांनी निराळे आहे, पण तेथील प्रयाेगशीलता आपण डाेळ्यांसमाेर ठेवणे आवश्यक आहे.यापूर्वी एका बाबीचा या सदरात उल्लेख करून झाला आहे की, जगातील निम्मे क्षेत्र हे दूध न पचणारांचे आहे. त्याला लॅक्टाेसे इन्टाॅलरंट म्हणतात. त्यांना दूध पचावे म्हणजे न्यूझीलंडला जगातीलफार माेठा दुधाचा व्यवसाय मिळेल, या उद्देशाने त्या देशाने केलेले प्रयत्न जगाला अतिशय उपयाेगी पडलेले आहेत. चीनसारखा देश पंचवीस वर्षापूर्वी दूध हा विषय हाताळायला तयार नव्हता. ताे देश आज जगातील सर्वात माेठा दूध वापरणारा देश झाला आहे.
 
त्यासाठी त्यांनी तेथील यलाे काऊ की, जी मूळची भारतीय गाेवंशापैकी आहे, तिचा विकास केला. न्यूझीलंडचे हे फक्त एक वैशिष्ट्य झाले. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत काेणाला कसे दूध हवे, यावर त्या देशाने काम केले आहे.ही सारी माहिती भारतीय तरुणांपुढे ठेवण्याची गरज आहे. न्यूझीलंडच्या तुलनेत भारतात दुधावर काम करायला माेठा वाव आहे. एक काळ सारे जग आपल्याला परके वाटत असे पण आज तशी स्थिती नाही. माहिती तंत्रज्ञानासह अनेक औद्याेगिक क्षेत्रे अशी आहेत, त्या क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षात भारतीय तरुणांनी जगात आघाडी मिळवली आहे. ती काेणाच्या मेहेरबानीवर किंवा स्काॅलरशिपवर नव्हे, तर नवी नवी क्षेत्रे शाेधून आणि अविश्रांत परिश्रम करून मिळवली आहे.दूध या क्षेत्रात भारतीय गाेवंशाचीफार वैशिष्ट्ये आहेत. पण ती जगात जाऊन सिद्ध करावी लागतील. त्या दृष्टीने याेग्य प्रयत्न झाला, तर भारतहान्यूझीलंडच्याफारपुढेजाईल.न्यूझीलंडसारख्या एका बेटावरील देशात तेथे पन्नास लाख लाेक दुधाच्या व्यवसायात गुंतले आहेत. दुधाच्या व्यवसायात तेथे पन्नास लाख गाई आहेत. तेथील तरुणांची जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि अभ्यासुवृत्ती ही मार्गदर्शक ठरू शकणारी आहे.