दूधाच्या क्षेत्रात ऐतिहासिक काम केलेले युक्रेनचे शास्त्रज्ञ डाॅ इलिया मेट्च्निकाॅफ यांची साऱ्या जगाला या आठवड्यात आठवण हाेत आहे.
(1404)
इ.सन 1908 मध्ये नवे औषध शाेधण्याबाबत नाेबेल सन्मान मिळालेल्या या शास्त्रज्ञाचा वास्तविक या वर्षाशी कांहीही संबंध नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांना प्राण्याचे अन्नपचन या क्षेत्रात महत्वाची संशाेधने केल्याबद्दल नाेबेल सन्मान मिळाला. पण त्यांच्याबाबत असे म्हणता येईल त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कामाची किंमत जगाला कळलीच नाही.इ.सन 1921 मध्ये त्यांच्या संशाेधनावर अन्य शास्त्रज्ञांनी संशाेधन केल्याने त्यांच्या संशाेधनाचे महत्व समजले.प्राण्याच्या शरीरातील अन्नाचे पचन कसे हाेते, याचे त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी संशाेधन सुरू केले. त्या काळी ते त्यावर जाहीर व्याख्यानेही देत असत.एवढेच नव्हे तर त्याची प्रात्यक्षिकेही दाखवत असत. आठ वर्षाच्या मुलाला काय कळणार आणि ताे त्याची प्रात्यक्षिके कशी दाखवणार, अशी शंका साहजिकच त्याचे भाषण ऐकणारांना पडत असे. पण त्याचे प्रात्यक्षिक पाहिल्यावर त्याचा विषय समजून घेण्याआधीच ते थक्क हाेत असत.
कारण ताे पाण्यातील पारदर्शक मासे, खेकडे गाेळा करून त्यांच्या पाेटातील पाचन प्रक्रिया दाखवत असे. साेळाव्या वर्षी ताे एका महाविद्यालयातील एका प्राध्यापकांकडून त्याच्या संशाेधनासाठी काही वेळेपुरता सूक्ष्मदर्शक आणत असे.त्याला जे नाेबेल मिळाले ते पचनप्रक्रियेला गती देणाऱ्या पेशी शाेधण्यासाठी मिळाले.डाॅ इलिया मेट्च्निकाॅफ यांची दूध क्षेत्रातील जी संशाेधने आहेत, ती त्या काळी मान्य हाेणारी नव्हती पण ती सर्वांना पटत हाेती. त्याचे संशाेधन म्हणजे दूध हे न तापवता प्यावे. त्याचे म्हणणे असे की, आपण दूध तापवताे म्हणजे त्यातील प्राण्याच्या कल्याणासाठी गाईने निर्माण केलेले जे सूक्ष्म जीव आहेत, ते आपण ठार मारताे.
आपण जे तापवलेले दूध पिताे त्यात मूळ दुधाच्या पाच टक्केही सत्व असते आणि जे असते तीही खऱ्या सत्वाची राख असे. गाईचे दूध हे जगाला तारणारे तत्व आहे पण आपण त्याची राखरांगाेळी करून हे पृथ्वीवरील पापाचा भार वाढवताे.डाॅ मेट्च्निकाॅफ याचे म्हणणे असे असे की, पृथ्वीवर जेवढ्या गाई आहेत, त्यांचे दाेन दाेन औंस जर प्रत्येकाने घेतले तर एका माणसाच्या एका दिवसाच्या दाेन जेवणांची पूर्तता हाेईल. डाॅ मेट्च्निकाॅफ आजच्या युक्रेनचे नागरिक हाेते. त्यांचे म्हणणे असे की, युक्रेनचे नागरिक आजही शतायुषी आहेत. कारण ते गाईचे दूध न तापवता पितात. माेरेश्वर जाेशी, 9881717855