श्रीलंकेतील चिंतन : गाेहत्या सुरू झाल्यावर माणसाच्या आयुष्यात घट

    05-Jun-2021   
Total Views |
 
 जगाच्या काही लाख वर्षांंच्या इतिहासाचा आढावा घेतला तर असे लक्षात येईल की, माणसाने गाेवंश मारून त्याचे मांस खायला आरंभ केला आणि तेव्हापासून माणसाचे आयुष्यमान कमी झाले.(भाग : 1402)
 

cow_1  H x W: 0 
या घटनेपासून जगाने एक घडा घेण्याची गरज हाेती की, गाेमांस आहारातून कमी करावे पण ते केले गेले नाही. जगात आज ज्या महाभयंकर समस्या उद्भवल्या आहेत, त्याही माणसाच्या प्राणीमांस भक्षणाच्या वृत्तीतून निर्माण झाल्या आहेत, हा आशय श्रीलंकेतील एक वरिष्ठ अभ्यासक श्रीपाल निशंक फर्नांडाे यांनी तेथील कायदामंत्री एम. यू. एम. अलि साब्री यांना लिहिलेल्या पत्रातील आहे. या पत्राद्वारे त्यांनी श्रीलंकेत गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात संमत झालेल्या गाेहत्याबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये हे विधेयक मान्य झाले आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष गाेतबाया राजपक्षे यांनी त्यावर सही करून त्याचे कायद्यात रूपांतरही केले.
 
पण त्यानंतर न्यायालयातून आणि काही आंदाेलनातून गाेहत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत वारंवार अडचणी येत आहेत. या विधेयकायासाठी श्रीलंकेतील जनेतेने गेल्या शंभर वर्षांत केलेल्या त्यागाची आठवण ठेवावी आणि त्यासाठी कायदामंत्री अली साब्री यांनी कडक भूमिका घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्रीपाल निशंक फर्नांडाे यांनी केले आहे. त्या पत्रात ते पुढे म्हणतात, माणसाला ज्ञात असलेला सगळा इतिहास जर तपासला तर प्रारंभापासून गाईचे मानवजातीवर प्रचंड उपकार आहेत.
आजही आपण एक अनुभव करू शकताे की, आपल्या आजूबाजूला गाय असणे ही सुद्धा उपयाेगी बाब असते. त्याचे फायदे तर तीन वर्षांचे मूलही जाणते.
 
त्या फायद्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये ज्या लाेकभावना व्यक्त झाल्या, त्याच्याच आधारे गाेहत्याबंदीचे विधेयक संमत झाले आहे. तरीही त्याच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत, त्या कायदामंत्री अली साब्री यांनी लाेकसंवादाच्या माध्यमातून दूर कराव्यात.
या विषयाची गाेविज्ञान विषयक श्रीलंकेतील पार्श्वभूमी अशी की, श्रीलंकेत आजही अधिकृत वैद्यक म्हणून आयुर्वेदाला मान्यता आहे. त्यात गाेमूत्र आणि पंचगव्य यांचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेतच असताे. त्याचा आधार घेऊन श्रीपाल निशंक फर्नांडाे म्हणतात, येथे गाेहत्याबंदी प्रत्यक्षात आली तर येथे प्रत्यक्ष स्वर्ग अवतरेल. हा विषय तेथील लंका वेब या दैनिक बातम्यांच्या पाेर्टलवर आला आहे. माेरेश्वर जाेशी, 9881717855