ईशान्य भारताच्या प्रगतीला गाेविकासाने गती येईल

    04-Jun-2021   
Total Views |
 
 
अनेक ठिकाणी तर जेथे दारूच्या हातभट्ट्या हाेत्या तेथे गाेमूत्र तयार करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या.संपूर्ण, आसाम, आजूबाजूची छाेटी छाेटी सात राज्ये येथेही ही प्रक्रिया आवश्यक आहे.(भाग : 1401)
 
 

cow_1  H x W: 0 
आसाममधील देशी गाय त्या देशाच्या अन्य भागातील गाेधनाच्या तुलनेत अजून काही वैशिष्ट्ये असणारी आहे. हा सारा हिमालयाशी निगडित प्रदेश आहे. एका बाजूला माेठमाेठ्या उंच पर्वतांच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्मपुत्रेसारखी विशाल पात्र असलेली नदी आहे. विशाल पात्रामुळे आणि हजाराे छाेट्या नद्या तिला मिळत असल्याने ब्रह्मपुत्र हिला नदी न म्हणता नद म्हणतात.गाेजीवनावर त्याचा हाेणारा परिणाम म्हणजे सपाट रानाची कुरणे तेथे कमी आहेत. पण, डाेंगरांच्या दऱ्याखाेऱ्यात वाढणाऱ्या गाेवंशाची संख्या येथे माेठी आहे. अर्थात ही बाब फक्त आसामपुरती मर्यादित नाही, तर माणसालाही चढायला आणि उतरायला अवघड असणाऱ्या कड्यावरून येथील गाई, बैल, म्हशी, शेळ्या मेंढ्या अतिशय लीलया वावरत असतात.
 
त्यांच्या पायाची रचनाच तशीच असते. गाेपालनाच्या विषयाला लागून अजून एक विषयाचा येथे प्रभाव आहे, ताे म्हणजे येथील काही भागात ‘लॅक्टाेसे इन्टाॅलेरन्सी’चा प्रभाव आहे.असा प्रभाव अगदी पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत संपूर्ण चीनमध्ये हाेता. हा प्रकार म्हणजे दूध न पचणे. गेल्या पंचवीस वर्षात चीनने दूध न पचण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक संशाेधकांच्या मदतीने प्रयाेग केले. तेथे औद्याेगिक कामगारांची लाेकसंख्या माेठी असल्याने त्यांना ताे उपाय करावा लागला.आसाम भागातही ताे प्रकार छाेट्या प्रमाणावर आहे. ही समस्या आग्नेय आशियातही आहे. पण, दुधाचे ायदे लक्षात घेऊन आता दुधाचे पदार्थ तयार करून त्यांचा वापर करण्याची पद्धत तेथे सुरू झाली आहे. त्यामुळे आता गाेसंस्कृती तेथे घराेघर वाढू लागली आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये दहा हजार गावात रा.स्व.संघाच्या माध्यमातूनच गाेआधारित शेती आणि गाेवैद्यक यांची माहिती पाेहाेचविण्यात आली आहे.त्या भागातील गाेविज्ञान प्रचारकांचा अनुभव असा आहे की, तेथे कॅन्सर, किडनीच्या व्याधी आणि मधुमेहाच्या व्याधी यासाठी पंचगव्याचा प्रचार करण्यात आला. त्याचा तर उपयाेग झालाच; पण तेथे न कळत घडलेली बाब म्हणजे लाेकांची दारूची व्यसने त्यामुळे कमी झाली.अनेक ठिकाणी तर जेथे दारूच्या हातभट्ट्या हाेत्या तेथे गाेमूत्र तयार करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. संपूर्ण, आसाम, आजूबाजूची छाेटी छाेटी सात राज्ये येथेही ही प्रक्रिया आवश्यक आहे.अर्थात ही बाब कायदा मान्य करून हाेणार नाही; पण गाेपालनाचे महत्त्व समजण्याने निश्चित हाेईल.
 
माेरेश्वर जाेशी, 9881717855