चीनच्या संदर्भात काेराेना आणि त्याची वुहानमधील ‘व्हायरस लॅब’ हा जसा विषय प्रकाशात आला, त्याचप्रमाणे त्या देशाने अणुबाॅम्बचा साठा केला जाताे, त्याप्रमाणे त्या देशाने अनेक युद्धासारखा परिणाम घडविणाऱ्या विषारी व्हायरस बाॅम्बचा साठा केला आहे, हेही लक्षात आले. अर्थात असे प्रकार करणारा चीन हा काही पहिला देश नाही. (भाग : 1428)
जगातील अनेक देशांकडे असे साठे आहेत. इ.सन 1944 मध्ये या जगाला हायड्राेजन बाॅम्बचा अनुभव येऊन गेला आहे. त्यानंतर एवढी माेठी हानीची लष्करी कृती झाली नव्हती. त्यामुळे जगाला त्यादृष्टीनेही विचार करावा लागणार आहे.चीनने यावर्षीच त्यांच्या बाैद्ध पंचांगातील ‘गाेवंश’ वर्ष पाळण्याला आरंभ केला आहे. तेथील गरिबी असलेल्या प्रांतात प्रत्येक शेतकऱ्याला एक गाई देण्यास आरंभ केला आहे. सर्वांत अधिक गरिबी असणाऱ्या ‘गन्सू’ या प्रांतात पाच काेटी गाई वाटल्या, तर एकूण वीस काेटी गेल्या दाेन वर्षात शेतकऱ्यांना वितरीत केल्या आहेत. याचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे एका बाजूला सर्वप्रकारची युद्धतंत्रे हस्तगत करणारा चीन गाेवंशाच्या वाढीतही आघाडी घेत आहे.
काेणताही देश छाेट्या छाेट्या बाबीतून माेठ्या युद्धाची तयारी करत असताे, याचेच हे उदाहरण आहे.रासायनिक खतांचे महायुद्ध हा जसा आपल्याला दैनंदिनी सामना करावा लागणारा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे काेराेनाही पुढील काही वर्षे दैनंदिनी सामना करावा लागणारा मुद्दा आहे. पण, त्याचे स्वरूप एका सांसर्गिक राेगाची वैश्विक महामारी एवढे मर्यादित नाही. सुरुवातीला त्याचे स्वरूप हे विषाणूची साथ असेच वाटले हाेते. पण, चीनमधील वुहान येथील त्यांच्या ‘नॅशनल लॅब ऑफ व्हायरालाॅजी’ या परिसरातून काेराेनाचा विषाणू बाहेर पडल्याने जगातील जाणकार त्याचा महायुद्ध असाच अर्थ लावत आहेत. अर्थात यातून अर्थ काढण्याची ही सततची प्रक्रिया असल्याने एवढ्यात काेणी निष्कर्षाला येणे बराेबर ठरणार नाही.
सारे जग सध्या तरी या समस्येतून स्वत:ला सावरून बसण्याच्या स्थितीत आहे. हळूहळू त्याचा राेग म्हणून किंवा ते आक्रमण असेल, तर त्याचा सामना कसा करायचा, यावर विचार सुरू झाला आहे. त्यात माणसाची भूमिका येवढीच असणे आवश्यक आहे की, आपल्या देशाची जी भूमिका असेल, त्याला सर्वशक्तिनिशी मदत करणे आणि दुसरे म्हणजे अशा संकटांचा सामना करताना दुप्पट सामर्थ्याने उभे राहणे.यावर उपलब्ध असणाऱ्या उपचार पद्धतीचा अनादर न करता स्वत:ची अशी जीवनशैली बनविणे की, त्यासाठीचे काळजी घेणे हे आपले सामान्य सामर्थ्य दुप्पट वाढविण्यास कारणीभूत ठरेल.अशावेळी ‘प्रत्येकाची शक्ती म्हणजे देशाची शक्ती’ याला महत्त्व येते.