युद्धसदृश काळात अन्नसुरक्षितता महत्त्वाची आहे

    29-Jun-2021   
Total Views |
 
 
 
गाे-आधारित शेतीवर भर देण्याची आवश्यकता अशासाठी आहे की, येणाऱ्या काळात रासायनिक खते अजून आक्रमक हाेण्याची शक्यता आहे.(भाग : 1427)
 

cow_1  H x W: 0 
 
सध्याचा समस्यांचा काळ लक्षात घेतला, तर एका बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी लागते की, जागतिक राेगांच्या साथी किंवा जागतिक युद्ध असाे, सामान्य लाेकांच्या समस्यांना काेणी वाली नसताे.त्यामुळे हा विषय ज्यांना महत्त्वाचा वाटेल, त्यांनी परावलंबित्व कमी करावे. यात सर्वांत माेठा वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग. त्याने छाेटे माेठे प्रयाेग करत जर शेतीसारखी बाब स्वयंपूर्ण केली, तर ताे जागतिक महामारीच्या किंवा जागतिक आर्थिक युद्धाच्या काेंडीत सापडणार नाही.एकदा का शेतकरी त्या दुष्टचक्रातून वाचला, तर देशाची अन्नधान्याची गरज सुरक्षित हाेईल. त्याचप्रमाणे प्रत्येकाला जैविक खतावरील अन्न मिळेल. अशावेळी असाही विचार करून ठेवावा लागत आह की, काेराेनाची समस्या थाेडी आटाेक्यात आल्यावर जगाने ही नैसर्गिक आपत्ती आहे की, चीनसारख्या महाशक्तीने पुकारलेले हे जागतिक युद्ध आहे.
 
दिवसेंदिवस हे ‘महायुद्ध’ आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. गेल्या 105 वर्षांत जगाने दाेन महायुद्धे पाहिली आहेत. काेणत्याही युद्धाचे परिणाम हे माेठे असतात. पण, अशावेळी माणसाला स्वत:ची जीवनशैलीच वाचण्याची शक्यता अधिक असते. काेराेना काळात अनेक औषधे, अनेक प्रतिबंधात्मक लस अशा बाबी पुढे येत आहेत. त्याला महत्त्वही आहे; पण स्वत:ची जीवनशैली हीच लस आहे आणि हेच औषध आहे. ताेच आहारही आहे आणि तेच मिष्टान्नही आहे. अशा संकटकाळातही जर गाे-आधारित शेती या बाबी स्वीकारल्या, तर जगाने अजून माेठे युद्ध पुकारले, तर आपल्यासाठी देश वाचण्याची शक्यता अधिक असेल.
गेली पाच वर्षे आपण गाेविज्ञानावर लेखन करत आहाेत; पण त्या विषयाला युद्धसदृश परिस्थितीचे निकष कधी लावले नव्हते.
 
कारण तशी परिस्थितीही नव्हती.पण, जागतिक पातळीवरील एका शक्तीने प्रत्यक्ष परिणामाने जर युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली असेल, तर सर्वांना तयारी तर ठेवावीच लागते. पण, अशा वेळी युद्धेही मुहूर्त ठरवून हाेत नसतात. अनपेक्षित छाेटी चकमक माेठ्या संहाराला कारणीभूत ठरते. कदाचित साऱ्या जगाला शहाणपण येऊन मध्यममार्गही निघताे. प्रत्यक्षात एका युद्धाएवढा परिणाम हाेऊन गेल्याने प्रत्यक्ष तयारी ही फार महत्त्वाची ठरते. आपण तर अशी तयारी सुचवत आहाेत की, युद्धासारखे प्रसंग ओढवले नाहीत, तरी तयारी वाया जाणार नाही. गेली सत्तर वर्षे इस्राईल जय्यत तयार आहे म्हणून चार दाेन छाेट्या लढाया करून महायुद्ध जिंकल्याचे सामर्थ्य मिळवले आहे.